आजकाल कलाकारांना चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे सोशल मीडिया. त्यामुळे कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय पाहायला मिळतात. आपले नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच आता सोशल मीडियावरील ट्रेंड बरेच कलाकार फॉलो करतात. त्यानुसार आपले डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेल्या एका अभिनेत्रीच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘मला लागली कुणाची उचकी’ हे गाणं ट्रेंड होतं आहे. त्यामुळे या गाण्यावर अभिनेत्री डान्स करताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली योगिता चव्हाणने या गाण्यावर जबरदस्त लावणी सादर केली होती. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. ज्यानंतर अभिनेत्री हेमांगी कवीने या गाण्यावर डान्स व्हिडीओ केला होता. आता ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेल्या सोनाली पाटीलने ‘मला लागली कुणाची उचकी’ गाण्यावर डान्स केला आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: फॅमिली वीकमध्ये झालं एविक्शन, चुम दरांगच्या आईची खरी ठरली भविष्यवाणी, ‘हा’ सदस्य झाला घराबाहेर
काही इमोजी कॅप्शनमध्ये देत सोनाली पाटीलने नुकताच डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली ऊसाच्या फडात दिसत आहे. हातात काठी घेऊन सोनालीने ‘मला लागली कुणाची उचकी’ गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या डान्सचं आणि एक्सप्रेशनचं कौतुक केलं जात आहे.
हेही वाचा – विराट कोहलीचे चाहते आहेत नाना पाटेकर; म्हणाले, “तो लवकर बाद झाल्यास माझी भूक…”
‘मस्त’, ‘एक नंबर’, ‘ऊसाच्या फडातील आधुनिक लावणी’, ‘साडी नेसली पाहिजे होतीस’, अशा संमिश्र नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटल्या आहेत. सोनालीचा हा डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
दरम्यान, सोनाली पाटीलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती काही महिन्यांपूर्वी ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ मालिकेत झळकली होती. त्याआधी सोनालीने ‘वैजू नंबर वन’, ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. एवढंच नाहीतर सोनालीने हिंदी मालिकेतही काम केलं. ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेत ती पाहायला मिळाली होती.