मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठा चाहता वर्ग असलेले अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. आतापर्यंत त्यांनी उत्कृष्ट कलाकृती सिनेसृष्टीला दिल्या असून यामधील त्यांच्या भूमिकाही जबरदस्त गाजल्या आहेत. त्यामुळे अनेक कलाकार मंडळी त्यांचे चाहते आहे. अशीच एक त्यांची चाहती नुकतीच त्यांना भेटली आणि या भेटीचा अनुभव तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा – “आता धरती मातेचं काय होईल?” वजनावरून डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर म्हणाली, “आहे वजनदार पण…”
नाना पाटेकरांची ही चाहती म्हणजे बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सोनाली पाटील. ती नुकतीच नाना यांना भेटली आणि या क्षणाचा व्हिडीओ, अनुभव लगेचच चाहत्यांबरोबर शेअर केला. नानांबरोबर व्हिडीओ शेअर करत सोनालीनं लिहीलं आहे की, “जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा ठरवलं होतं या ‘माणसाला’ भेटायचं. तसं आम्हा सगळ्याच कलाकारांना आमच्यापेक्षा वयाने, कामाने आणि अनुभवांने मोठ्या असलेल्या लोकांना भेटायचं असतं. पण, तुम्हाला भेटायचं एक वेगळं कारण माझ्याकडे होतं आणि ते म्हणजे ‘स्पोर्ट्स इंडस्ट्री’ आणि ‘मराठी इंडस्ट्री’मध्ये आपण दोघेही काम करतो… मलाही १० मीटर एअर पिस्तुल शूटिंग करायला आवडतं आणि टेलिव्हिजन वरचं म्हणजे नॉर्मल शूटिंग करायलाही आवडतं…तुमचं ही अगदी तसंच आहे. तुम्हालाही पिस्तुल शूटिंग करायला आवडतं आणि इंडस्ट्रीमधल्या शूटिंगबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल ‘क्या कहने'”
हेही वाचा – स्वप्नील जोशीचा ‘या’ अभिनेत्रीबरोबर लंडनच्या ब्रीजवर रोमान्स; व्हिडिओ व्हायरल
“हेच जेव्हा तुम्ही भेटलात तेव्हा सांगायचं होतं की सर, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक गोष्ट ‘कॉमन’ आहे. ती म्हणजे तुम्हालाही पिस्तुल शूटिंग आवडतं, रेंजवरती जायला आवडतं आणि नॉर्मल स्क्रीन शूटिंगही आवडतं …माझं सुद्धा तुमच्यासारखंच आहे बरं का, मी ही १० मीटर एअर पिस्तुल ऑल इंडिया वुमन चॅम्पियनशिप, अमृतसर खेळले आहे. पण बोलायचं तेवढं धाडस झालं नाही. धाडस म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या. त्यामधून ही गोष्ट बोलायचीच राहून गेली.”
हेही वाचा – “अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही…”; ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरच्या मुलीची शाळा आहे फारच खास
“कारण एकाच फ्लाईटमध्ये आम्ही प्रवास करत होतो. पण जसं फ्लाईटमधून खाली उतरलो तसं अगदी लहान मुलं पाठलाग करत जातं तसं मी तुमचा पाठलाग करत आले. तुमच्याशी बोलले पण तुमच्यात इतका साधेपणा की, मी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करते, टेलिव्हिजनला काम करते म्हटल्यावर अगदी कौतुकाने तुम्ही माझ्याकडे बघितलं. माझ्याबरोबर मेघाताई होती. तिच्याशी तुम्ही छान बोललात…फोटो घेऊ का? जर तुम्हाला वेळ असेल तर नाहीतर तुम्हाला त्रास नाही देणार ….यावर ते हसून ‘हो अगदीच’, असं म्हणून तुम्ही न थकता, कुठलाही चेहऱ्यावरती भाव न आणता अगदी हसत मुखाने फोटो दिलात ऑल द बेस्ट केलंत. खूप मोठा आणि छान गेला तो दिवस अगदी अविस्मरणीय,” असं सोनालीनं लिहीलं आहे.
हेही वाचा – “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”; शशांक केतकरवर एका ज्येष्ठ अभिनेत्यानं केली होती टीका, वाचा किस्सा
दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘वैजू नंबर वन’ मालिकेनंतर ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिनं काम केलं. तसेच ती बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातही दिसली होती. त्यानंतर तिनं हिंदी मालिकाविश्वात पाऊल ठेवलं. ‘वागले की दुनिया’ या मालिकेत तिनं काम केलं.