Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video : ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमुळे अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेली अंतराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मालिका संपल्यावर योगिता काही महिन्यांनंतर ‘बिग बॉस मराठी’ या शोच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली. ‘बिग बॉस’च्या घरातील भांडणं, वाद पाहून तिने हा खेळ मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या घरापासून लांब राहणं अभिनेत्रीला जमलं नाही.

योगिताकडून तिच्या चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. अभिनेत्रीला व्होटिंग सुद्धा चांगलं झालं. मात्र, दोन आठवडे उलटल्यावर तिने स्वत:हून या खेळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच प्रेक्षकांना सुद्धा मला या घराबाहेर जायचंय असं तिने सांगितलं होतं. योगिताचा हा प्रामाणिकपणा, सरळ-साधा स्वभाव अनेकांना भावला. अभिनेत्रीच्या संयमी स्वभावामुळे तिच्या चाहत्यावर्गात आणखी वाढ झाली.

हेही वाचा : चाळीशीत करिअरला खरं वळण! आधी ‘लक्ष्मी निवास’साठी दिलेला नकार, ऑडिशन झाली अन् मग…; हर्षदा खानविलकर म्हणाल्या…

योगिता आता शो संपल्यावर अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. याशिवाय वेळात वेळ काढून ती सोशल मीडियावर आपल्या नृत्याची झलक सर्वांना दाखवते. योगिताने आतापर्यंत अनेक लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं आहे. अभिनेत्रीने, “सध्याच्या ट्रेंडिंग जगात काही गाणी सदाबहार असतात” असं सुंदर कॅप्शन देत एका जुन्या बॉलीवूड गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘झुमका गिरा रे, बरेली के बाजार में’ हे गाणं ‘मेरा साया’ या १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात होतं. ‘झुमका गिरा रे’ या सदाबहार गाण्याचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. आजचा तरुणवर्ग सुद्धा हे गाणं आवडीने ऐकतो. याच गाण्यावर योगिताने कमाल एक्स्प्रेशन्स देत डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. हे गाणं दिग्गज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलेलं आहे.

हेही वाचा : जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”

हेही वाचा : ‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा

दरम्यान, योगिताचा कमाल डान्स पाहून नेटकऱ्यांसह काही मराठी कलाकारांनी तिच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाल केला आहे. अभिनेत्रीचा पती सौरभ चौघुलेने बायकोचा डान्स पाहून ‘आय लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी “खूप छान नृत्य सादर केलं” असं म्हणत योगिताचं कौतुक केलं आहे.

Story img Loader