गेल्या काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली अभिनेत्री योगिता चव्हाण सध्या खूप चर्चेत असते. या चर्चेचं कारण असतं तिचं नृत्य कौशल्य. योगिता नेहमी सोशल मीडियावर ट्रेंड असलेल्या गाण्यावर जबरदस्त नृत्य करताना दिसते. योगिताच्या अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहे, तितकाच आता तिच्या नृत्याचा चाहता वर्ग तयार झाला आहे. त्यामुळे तिचा प्रत्येक नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतो. सध्या योगिताच्या ठसकेबाज लावणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकतंच फुलांचं इमोजी कॅप्शनमध्ये देऊन योगिता चव्हाणने एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका कॉलेजच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये योगिताची ठसकेबाज लावणी पाहायला मिळत आहे. यासाठी तिने फिकट गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे; ज्यामध्ये योगिताचा खूपचं सुंदर दिसत आहे. तिने ‘मला पिरतिच्या झुल्यात झुलवा’ यावर जबरदस्त लावणी सादर केली आहे.

योगिताने सादर केलेली लावणी चाहत्यांना खूप आवडली आहे. नेहमीप्रमाणे चाहत्यांनी योगिताचं भरभरून कौतुक केलं आहे. “मस्तच”, “योगिता नृत्य खूप छान केलं आहे”, “‘बिग बॉस’मध्ये हे केलं असतं तर आज विजेती झाली असतीस”, “कडक परफॉर्मन्स”, “खूप सुंदर, मोहक अदाकारी आणि योगिता खरंच एखादा तू चित्रपट कर. साडीमध्ये छान दिसतेस”, “एक नंबर” अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

दरम्यान, योगिता चव्हाणच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली अंतरा ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर योगिता चव्हाण ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीझोतात आली. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात योगिता चव्हाण पाहायला मिळाली. अभिनेता सौरभ चौघुलेबरोबर लग्न केल्यानंतर सात महिन्यांनी योगिता ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकली. पण या वादग्रस्त शोमध्ये तिचा जास्त काळ टिकाव लागला नाही. काही दिवसांत योगिता घराबाहेर झाली. आता योगिता कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय? याची उत्सुकता लागली आहे.

Story img Loader