Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्यात घरात मानकाप्याची एन्ट्री झाली आहे. आता संपूर्ण आठवडाभर घरात मानकाप्याची दहशत असणार आहे. या दहशतीमुळे ‘बिग बॉस’ने घरातील सर्व सदस्यांना एकटं फिरण्यास मनाई केली आहे. हा टास्क नेमका काय आहे आणि घरात आजच्या भागात नेमकं काय-काय घडलं? जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर “इथून पुढे मी ‘ए’ ग्रुपमध्ये नसेन” असं निक्की तांबोळीने स्पष्ट केलं होतं. यामुळे आता निक्की विरुद्ध टीम A असं समीकरण घरात तयार झालेलं आहे. यांच्या मैत्रीत उभी फूट पडली आहे. अशातच घरातल्या सगळ्या सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं आणि याचं कारण म्हणजे मानकाप्या. या आठवड्यात घरात सगळीकडे भूताची थीम बनवण्यात आली आहे. याशिवाय घरातल्या सगळ्या लाइट्स चालू-बंद करण्यात आल्या. यामुळे सगळेच सदस्य मनात नेमकं काय होतंय हा विचार करून बैचेन झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात नेमकं काय सुरू आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “आता शांत बसायचं, तुमचा गेम संपलाय…”, रितेश भडकल्यावर घन:श्यामने रडून जोडले हात! नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi

मानकाप्याची एन्ट्री झाल्यावर आता इथून पुढे आठवडाभर घरात एकट्याने फिरण्यास मनाई आहे असं ‘बिग बॉस’कडून स्पष्ट करण्यात आलं. आता यासाठी घरात ‘बिग बॉस’कडून सगळ्या स्पर्धकांच्या जोड्या तयार करण्यात आल्या आहेत. अभिजीत व निक्कीची अपेक्षेप्रमाणे पहिली जोडी बिग बॉसने जाहीर केली. यानंतर अरबाज पटेल – आर्या जाधव, जान्हवी किल्लेकर – सूरज चव्हाण, वैभव चव्हाण – धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे – छोटा पुढारी घन:श्याम, वर्षा उसगांवकर – अंकिता वालावलकर अशाप्रकारे जोड्या पुढील आठवडाभर असतील असं ‘बिग बॉस’ने सर्व सदस्यांना सांगितलं.

हेही वाचा : ७ वर्षांचा संसार मोडला, लोकप्रिय अभिनेत्री आर्थिक सल्लागार पतीपासून झाली वेगळी; म्हणाली, “पाच वर्षांची मुलगी…”

टास्क नेमका काय आहे ?

‘बिग बॉस’च्या घरात पुढील आठवडाभर सर्व सदस्यांना नेमून दिलेल्या जोडीदाराबरोबर एका बंधनात अडकावं लागणार आहे. आपल्या जोडीदारशिवाय घरात एकटं फिरण्यास सदस्यांना मनाई करण्यात आली आहे. आता ‘बिग बॉस’ने तयार केलेल्या अनोख्या जोड्यांमुळे घरात काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच नव्या प्रोमोमध्ये अभिजीतमुळे अरबाज निक्कीवर संतापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढच्या भागात नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi forms new pairs in house for the task know in details sva 00