Bigg Boss Marathi Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबरला पार पडला. या फिनालेच्या सोहळ्याला प्रेक्षकांची देखील भरभरून पसंती मिळाली. कारण, टीआरपीमध्ये देखील या सोहळ्याने उच्चांक गाठला होता. ‘बिग बॉस’च्या ग्रँड फिनालेला मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या भागाचं होस्टिंग करण्यासाठी रितेश खास परदेशातलं शूटिंग सोडून एका दिवसासाठी भारतात परतला होता. यावेळी त्याच्याबरोबर त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख सुद्धा उपस्थित होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेक्षकांमध्ये बसून जिनिलीयाने मोठ्या आवडीने हा संपूर्ण सोहळा पाहिला. सूरजला यंदाच्या पर्वाचा विजेता म्हणून घोषित केल्यावर जिनिलीया अन् रितेशने बॅकस्टेजला मेकअप रुममध्ये सूरजची भेट घेतली होती. याचा व्हिडीओ देखील रितेशने सोशल मीडियावर शेअर केला होता.

हेही वाचा : मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो

सूरज चव्हाण काय म्हणाला?

सूरजने रितेशला ( Bigg Boss Marathi ) पाहताच क्षणी त्याला मिठी मारली होती. अभिनेत्याने सुद्धा त्याला मोठ्या प्रेमाने जवळ घेऊन त्याचं कौतुक केलं. यावेळी सूरज त्याला म्हणालेला, “अहो सर, तुम्ही आलात म्हणून मी आलो, नाही. मी खरंच बोलतोय… जेव्हा मला समजलं ना तुम्ही आहात यावर्षी म्हटलं जायचं… आता झापुक झपूक पॅटर्न दाखवू… किंग गुलीगत!” याचा अर्थ रितेश यंदा होस्ट म्हणून आहे हे समजल्यावर मी शोसाठी होकार दिला अशा भावना सूरजने जिंकल्यावर व्यक्त केल्या होत्या.

यानंतर बऱ्याच मुलाखतींमध्ये रितेशने आगामी चित्रपटांमध्ये काम करताना आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी स्वत:चा मॅनेजर दिलाय असंही सूरजने सांगितलं होतं. आता नुकत्याच ‘लोकशाही’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने रितेश-जिनिलीयाने घरी येण्याचं निमंत्रण दिलंय आणि मी सुद्धा नक्की जाणार असा खुलासा केला आहे.

सूरज म्हणाला, “रितेश सर म्हणजे देवमाणूस आहेत. त्यांच्या साधा-सिंपल स्वभाव मला खूप आवडतो. आता मी त्यांच्या घरी जाणार आहे. मुंबईला गेल्यावर नक्की जाईन. वहिनी पण मला मेकअप रुममध्ये भेटल्या होत्या. त्या खूपच खूश होत्या. त्या मला म्हणाल्या, सूरज तुम्ही किती गोड बोलता. किती भारी तुमचा स्वभाव आहे.”

हेही वाचा : Video : रियान अन् राहिलचं बॉण्डिंग पाहून आई जिनिलीया भारावली! देशमुखांच्या सुनेने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

सूरज चव्हाण अन् रितेश देशमुख ( Bigg Boss Marathi )

“त्या दोघांनी मला सांगितलंय आमच्या घरी ये…आणि मी आता मुंबईला गेल्यावर नक्की त्यांच्या घरी जाणार. माझं घर झाल्यावर ते पूजेला नक्की येणार.” असंही सूरजने ( Bigg Boss Marathi ) यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi genelia and riteish deshmukh invited suraj chavan to their home sva 00