Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपल्यावर आता सध्या सर्वत्र यंदाच्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचं रियुनियन पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सूरज चव्हाणच्या मोढवे गावी धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण, इरिना असे सगळे सदस्य पोहोचले होते. या पाठोपाठ अंकिता वालावलकर आणि तिचा होणारा नवरा कुणाल हे दोघंही सूरजला भेटून आले. आता लवकरच पंढरीनाथ सुद्धा त्याची भेट घेणार आहे. पण, एकीकडे सगळे सूरजच्या गावी जात असताना दुसरीकडे छोटा पुढारीने मुंबई गाठून आपल्या लाडक्या बहिणीची भेट घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात पहिल्या दिवसापासून यंदा दोन गट पडले होते. यापैकी एका गटात निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी आणि घन:श्याम एकत्र खेळत होते. कालांतराने या ‘टीम ए’मध्ये फूट पडली आणि यांची मैत्री देखील तुटली. जान्हवी आणि वैभवने स्वतंत्रपणे आपला खेळ खेळण्यास सुरुवात केली. मात्र, शेवटपर्यंत निक्की, अरबाज आणि घन:श्याम एकत्र राहिले. या तिघांनी एकमेकांची साथ अजिबात सोडली नाही. अगदी घराबाहेर आल्यावर सुद्धा या तिघांनी आपली मैत्री निभावली आहे. याचा प्रत्यय छोटा पुढारीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओतून आला आहे.

हेही वाचा : Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार

छोटा पुढारीने अरबाजला चुकून ‘या’ नावाने दिला आवाज…

घन:श्याम आपल्या लाडक्या निक्कू ताईला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. यावेळी त्याने निक्की-अरबाजची भेट घेतली. या दोघांनी तुझ्या वाढदिवसाला डिसेंबर महिन्यात आम्ही तुझ्या गावी येणार असंही त्याला सांगितलं. हे ऐकून छोटा पुढारी खूपच आनंदी झाला. आनंदाच्या भरात तो म्हणाला, “२५ डिसेंबरला हे दोघं येणार आहेत. निक्की ताई बोलली मग विषय संपला. अरबाज दा…नाही भाई” घन:श्यामची ही चूक निक्की अचूक हेरते आणि म्हणते “बाई काय म्हणतोय दाजी…” यावर घन:श्याम म्हणतो, “नाही दाजी नाही भाई…दाजी करायचा विचार नक्कीच चालू आहे.” निक्की सुद्धा यावर हो असं उत्तर देते.

नेटकऱ्यांनी या तिघांची भेट झाल्याचं पाहून आनंद व्यक्त केला आहे. “माझी निक्कू ताई आणि अरबाजची भेट” असं कॅप्शन देत घन:श्यामने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या तिघांच्या चाहत्यांनी यांच्या ( Bigg Boss Marathi ) बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…

दरम्यान, आता मित्राला शब्द दिल्याप्रमाणे निक्की-अरबाज ( Bigg Boss Marathi ) डिसेंबरमध्ये छोटा पुढारीच्या वाढदिवसाला जाणार का आणि हे दोघं सूरजची भेट घेणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz in mumbai watch video sva 00