Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आता ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. यंदाचं पर्व शंभर दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरात एकूण ७ सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरात आता लवकरच मिडवीक एलिमिनेशन पार पडणार आहे. मात्र, तत्त्पूर्वी घरातील स्पर्धकांना आपला प्रवास एका चित्रफितीच्या माध्यमातून पाहता येणार आहे. आतापर्यंत झालेल्या ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमध्ये अंतिम आठवड्यात घरातील सगळ्या स्पर्धकांना त्यांचा प्रवास दाखवला जातो. प्रत्येक सदस्य आपला प्रवास पाहून काहीसे भावुक होतात. या कार्यादरम्यान ‘बिग बॉस’ स्वत: घरातील प्रत्येक सदस्यांचं मनोधैर्य वाढवतात. मात्र, यंदा या कार्यादरम्यान एक मोठा ट्विस्ट घरात येणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “त्याला मोठं घर, बाथरुम वगैरे माहिती नव्हतं”, ‘बिग बॉस’साठी सूरज चव्हाणने दिलेला नकार; गावात जाऊन टीमने केलेली मनधरणी

Bigg Boss Marathi : पहिल्यांदाच घराबाहेर येऊन पाहणार प्रवास

घरातील प्रत्येक सदस्याला त्यांचा ‘बिग बॉस’चा प्रवास दाखवण्यासाठी यावेळी घरात खास शिव ठाकरेने एन्ट्री घेतली आहे. मात्र, या खास कार्यादरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच इतिहासात आजवर न घडलेली गोष्ट घडणार आहे. यावर्षी सर्व स्पर्धकांना त्याचा प्रवास दाखवण्यासाठी खास घराबाहेर प्रत्यक्ष प्रेक्षकांमध्ये आणण्यात येणार आहे.

‘बिग बॉस मराठी’ च्या इतिहासात पहिल्यांदाच सगळे सदस्य Evict न होता घराच्या बाहेर पाऊल ठेवणार आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांसह या सगळ्या सदस्यांना त्यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास पाहायला मिळणार आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi निक्की तांबोळी ठरली यंदाची पहिली Finalist! अरबाज पटेलच्या कमेंटने वेधलं लक्ष, तर नेटकरी म्हणाले, “हिला फुकटात…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : महेश मांजरेकरांनी ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगसाठी ‘या’ दोन अभिनेत्यांना केली होती विचारणा, रितेश देशमुख नव्हे तर…

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. या पर्वात कोण बाजी मारणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi grand finale contestants first time step out from the house sva 00