Bigg Boss Marathi Grand Finale Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेच्या शूटिंगला आता सुरुवात झाली असून, ‘कलर्स मराठी’ने नुकतीच याची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. या सोहळ्यासाठी खास रितेश देशमुख दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर शोमध्ये उपस्थिती लावणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हे पर्व अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने यंदाचा विजेता कोण होणार? ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात ब्लॉकबस्टर ठरलेल्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. अखेर या ग्रँड सोहळ्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

हेही वाचा : Bigg Boss Marathi चा विजेता कोण होणार? टॉप-६ पैकी आघाडीवर कोण? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

अभिजीत सावंत अन् सूरज चव्हाणचा जबरदस्त डान्स

ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत या दोन स्पर्धकांचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. ‘झापुक झुपूक’ हुकस्टेप करत हे दोघंही सर्वांचं मन जिंकून घेणार आहेत. डान्स करताना दोघांचाही डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. सूरज तर स्कुटीवरून एन्ट्री घेत डान्स करणार असल्याचं या प्रोमोमध्ये दिसत आहे. दोघांनीही एकमेकांना उत्तम साथ देत भन्नाट डान्स केल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या दोघांच्या डान्सवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेषत: प्रेक्षकांना सूरज चव्हाणला पहिल्यांदाच वेस्टर्न लूकमध्ये एकदम स्टायलिश अंदाजात पाहता येणार आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेला उद्या ( ६ ऑक्टोबर ) सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना हा शो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आणि ‘जिओ सिनेमा’वर विनामूल्य पाहता येईल.

हेही वाचा : Devara Box Office Collection : ज्युनियर एनटीआरच्या सिनेमाची पहिल्या आठवड्यात जबरदस्त कामगिरी, एकूण कलेक्शन तब्बल ‘इतके’ कोटी

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात पुन्हा एंट्री, पण ‘तो’ एक सदस्य गैरहजर; नेटकरी म्हणाले…

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

आताच्या घडीला अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे सहा जण अंतिम फेरीत आहेत. तसेच व्होटिंग लाइन्स आता बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता या सहा जणांमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader