Bigg Boss Marathi 5 Grand Finale Date Time Finalist : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले आज ( ६ ऑक्टोबर ) पार पडणार आहे. दरवर्षी हा सीझन शंभर दिवसांचा असतो मात्र, यंदाचं पर्व अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या रिअ‍ॅलिटी शोला पहिल्या दिवसापासून जबरदस्त टीआरपी मिळाला. याशिवाय प्रेक्षकांची सुद्धा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला भरभरून पसंती मिळाली. अखेर आज विजेत्याची घोषणा होऊन या सुपरहिट पाचव्या पर्वाची सांगता होणार आहे.

६ ऑक्टोबरला म्हणजेच आज ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यंदा २८ जुलैला या पर्वाची सुरुवात झाली होती. यावेळी एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश घेतला होता. यानंतर एका मागोमाग एक प्रत्येक वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर कमी मतं मिळवणाऱ्या स्पर्धकांनी घराचा निरोप घेतला.

kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Lakhat Ek Amcha Dada actors dance video
Video : झापुक झुपूक…! ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स; सर्वत्र होतंय कौतुक
Bigg Boss 18 Shilpa shinde support to Digvijay singh rathee
Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…
Bigg Boss 18 Farah Khan slam on tajinder singh bagga and eisha singh for targeting karanveer mehra
Bigg Boss 18: फराह खान तजिंदर बग्गा-ईशा सिंहवर भडकली, सिद्धार्थ शुक्लाचा केला उल्लेख; नेमकं काय घडलं? जाणून घ्या
Bigg Boss 18 Farah Khan warns to rajat dalal on weekend ka vaar
Bigg Boss 18: “…तर तू थेट शो बाहेर होशील”, फराह खानने रजत दलालला चांगलंच झापलं अन् दिली शेवटची ताकीद, म्हणाली, “तू स्वतःला…”

याशिवाय दोन दिवसांपूर्वी घरात मिडवीक एव्हिक्शन पार पडलं होतं. यात वर्षा उसगांवकरांनी घरातून एक्झिट घेतली. वर्षा घराबाहेर आल्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे टॉप-६ स्पर्धक निश्चित झाले.

हेही वाचा : “तुमची WonderGirl शोमधून निरोप घेतेय, पण…”, घराबाहेर आल्यावर वर्षा उसगांवकरांची पहिली पोस्ट! म्हणाल्या, “या प्रवासात…”

अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा स्पर्धकांनी अंतिम फेरीत एन्ट्री घेतली आहे. आता यांच्यापैकी यंदाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : यंदाचे टॉप ६ स्पर्धक

हेही वाचा : अभिजीत सावंत ठरला ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा Finalist! ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेणारे टॉप-६ स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या…

Bigg Boss Marathi चा महाअंतिम सोहळा कुठे पाहता येणार?

रविवारी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सलग दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावरून ब्रेक घेतल्यावर रितेश स्वत: महाअंतिम सोहळ्यासाठी उपस्थित राहिला आहे.

६ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता ग्रँड फिनालेला ( Bigg Boss Marathi ) सुरुवात होईल. ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आणि विनामूल्य ‘जिओ सिनेमा’वर पाहता येणार आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

दरम्यान, प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर पाचव्या सीझनमध्ये टॉप – ६ स्पर्धकांपैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.

Story img Loader