Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दरवर्षी हा सीझन शंभर दिवसांचा असतो मात्र, यंदाचं पर्व अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या रिअ‍ॅलिटी शोला पहिल्या दिवसापासून जबरदस्त टीआरपी मिळाला. याशिवाय प्रेक्षकांची सुद्धा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला भरभरून पसंती मिळाली. त्यामुळे शो लवकर एक्झिट घेणार असल्याने सध्या सर्व प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे.

येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. २८ जुलैला या पर्वाची सुरुवात झाली होती. यावेळी एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश घेतला होता. यानंतर एका मागोमाग एक प्रत्येक वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर कमी मतं मिळवणाऱ्या स्पर्धकांनी घराचा निरोप घेतला. याशिवाय नुकतंच घरात मिडवीक एव्हिक्शन पार पडलं. यात वर्षा उसगांवकरांनी घरातून एक्झिट घेतली. वर्षा घराबाहेर आल्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे टॉप-६ स्पर्धक निश्चित झाले आहेत.

हेही वाचा : “तुमची WonderGirl शोमधून निरोप घेतेय, पण…”, घराबाहेर आल्यावर वर्षा उसगांवकरांची पहिली पोस्ट! म्हणाल्या, “या प्रवासात…”

अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा स्पर्धकांनी अंतिम फेरीत एन्ट्री घेतली आहे. आता यांच्यापैकी यंदाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. आपल्या आवडत्या सदस्यांना व्होट करून विजेता करण्यासाठी सध्या व्होटिंग लाइन्स सुरु करण्यात आल्या आहेत. या व्होटिंग लाइन्स शनिवारी ( ५ ऑक्टोबर ) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असणार आहेत.

Bigg Boss Marathi : यंदाचे टॉप ६ स्पर्धक

हेही वाचा : अभिजीत सावंत ठरला ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा Finalist! ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेणारे टॉप-६ स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या…

Bigg Boss Marathi चा महाअंतिम सोहळा कुठे पाहता येणार?

रविवारी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सलग दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावरून ब्रेक घेतल्यावर रितेश स्वत: महाअंतिम सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे.

६ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता ग्रँड फिनालेला ( Bigg Boss Marathi ) सुरुवात होईल. ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आणि विनामूल्य ‘जिओ सिनेमा’वर पाहता येणार आहे.

Bigg Boss Marathi

दरम्यान, प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर पाचव्या सीझनमध्ये टॉप – ६ स्पर्धकांपैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.