‘बिग बॉस मराठी’च्या चौथा पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, राखी सावंत आणि अमृता धोंगडे हे टॉप ५ स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले होते आणि कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राखी सावंत, किरण माने अमृता धोंगडे आधीच शर्यतीतून आऊट झाले. त्यानंतर अक्षयने अपूर्वा नेमळेकरवर मात करत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात यंदाच्या पर्वातील घरातून बाहेर पडलेल्या सदस्यांनी हजेरी लावली होती. पण, त्यापैकी रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे हे दोघं या सोहळ्यात पाहायला मिळाले नाहीत. महाअंतिम सोहळ्यात गैरहजर असलेल्या रुचिराच्या पोस्टने मात्र लक्ष वेधून घेतलंय. “प्रत्येक क्षणी जेव्हा मला असं वाटलं की हा शेवट असेल, तिथे मी ठरवलं की हा इंटरव्हल पॉइंट आहे. प्रेम, विश्वास आणि शांती. आयुष्य अनमोल आहे आणि तुम्हीही!” असं कॅप्शन देत रुचिराने डायरीच्या काही पानांचे फोटो शेअर केले आहेत.

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा, अक्षय केळकरने कोरले ट्रॉफीवर नाव

त्यात लिहिलंय, “एंड ऑफ द चाप्टर, एंड ऑफ द जर्नी, पण माझ्या आयुष्याचा इंटरव्हल पॉइंट. मला आज तुम्हा सर्वांशी एक गोष्ट शेअर करायची आहे, त्यातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. मी इंडस्ट्रीत नसताना हा शो पाहायचे. फॉलो करायचे आणि स्वतःला या शोमध्ये कल्पना करत पाहायचे. माझा कॉलेजनंतर थिएटर, टीव्ही आणि नंतर चित्रपटांचा प्रवास सुरूच आहे. अशातच मला २०२१मध्ये बिग बॉससाठी विचारणा झाली होती. पण बहिणीच्या लग्नामुळे तेव्हा मला जमलं नाही आणि मला यंदा पुन्हा विचारण्यात आलं. पण तो ट्विस्ट होता, यंदाचा सर्वात मोठा ट्विस्ट. मी खूश होते, थोडी भीतही होते, पण मला विश्वास होता. पण माझं वैयक्तिक आयुष्य टीव्हीवर उघड करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. हा शो माझ्यासाठी जवळचा होता. माणूस म्हणून आपण जसे असतो, तसे इथे दिसतो. खूप गोष्टी ठरवल्या होत्या, पण तशा झाल्या नाहीत. या इंडस्ट्रीत प्रत्येक संधी महत्त्वाची असते, माझ्यासाठीही होती. प्रत्येक शोनंतर वेगळा संघर्ष असतो. मी जीव ओतून शोमध्ये खेळले. जी गोष्ट मला अ‍ॅडव्हान्टेज म्हणून मिळाली होती, तीच दुर्दैवाने माझ्यासाठी डिसअ‍ॅडव्हान्टेज ठरली. ती नॅचरल राहिली असती तरी मला चाललं असतं,” हे रोहित तिच्यासह शोमध्ये असण्याबद्दल रुचिरा बोलली आहे.

“बाकी ते ठरवतीलचं…” रुचिरा जाधवने केली ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांची पोलखोल

पुढे तिने लिहिलं, “शो जिंकणे-हरणे हा मुद्दा नाही. मला मनासारखं खेळता न आल्याचा त्रास झाला. बदल फार जवळून पाहिलाय मी आणि त्या धक्क्यातून अजून सावरू शकलेले नाही. काही गोष्ट ठरवल्या होत्या, स्वप्न पाहिली होती आणि ती फक्त माझ्यासाठी नव्हती. शिवाय तुम्ही सगळे काय बोलता, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला कमवायला खूप वर्षे लागली आहेत,” असं रुचिरा प्रेक्षकांबदद्ल म्हणाली.

“मी ज्या भावनिक टप्प्यातून जात आहे, ते मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही. मी एकटीच लढतेय. तुम्हाला पूर्ण गोष्टी माहीत नाही, त्यामुळे मला समजून घ्या, असं मी तुम्हाला म्हणत नाही. महिला असल्याने, पब्लिक फिगर असल्याने आणि अभिनेत्री असल्याने खूप गोष्टी बोलायच्या टाळतेय. पण कधी कधी खूप गुदमरायला होतंय, इतकंच सांगेन. तुमच्या स्वप्नांचा आदर न करणाऱ्यांसाठी तुमचं आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःवर पुन्हा एकदा विश्वास ठेवा आणि तुमची स्वप्न जगा,” असं रुचिराने या पोस्टमध्ये म्हटलंय.

या पोस्टमध्ये तिने रोहित शिंदेशी ब्रेकअपनंतर तिची अवस्था आणि बिग बॉसचा प्रवास याबद्दल सांगितलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi grand finale ruchira jadhav says end of journey talks about rohit shinde breakup hrc