Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा आठवडा आजपासून सुरू होणार आहे. आजच्या भागात ‘बिग बॉस’च्या घरात मानकाप्या येणार आहे. आता हा मानकाप्या नेमका कोण आहे? ‘बिग बॉस’कडून देण्यात आलेला हा नवीन टास्क नेमका काय असेल? याबाबत लवकरच उलगडा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानकाप्याची दहशत दाखवण्यासाठी संपूर्ण घरात भितीदायक वातावरण दाखवणारी थीम तयार करण्यात आली आहे. याचा प्रोमो नुकताच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर शेअर करण्यात आला आहेत. घरातील दिवे बंद झाल्याने सगळे सदस्य इकडे-तिकडे धावत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, घरातली नवीन थीम पाहून आणि लाइट्स बंद झाल्याने अनेक सदस्यांच्या चेहऱ्यावर भीती निर्माण झाल्याचं या प्रोमोमध्ये दिसत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘सिंगल’ नव्हे तर अरबाज पटेल आहे ‘कमिटेड’! ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीसमोर स्वत:च केलं मान्य; ‘तो’ प्रश्न विचारताच म्हणाला…

जान्हवीला जेलबाहेर पाहून नेटकरी संतापले…

‘बिग बॉस मराठी’चा हा नवीन प्रोमो पाहून नेटकरी मात्र काहीसे भडकले आहेत. पॅडीचा अपमान आणि त्याच्या करिअरवर केलेलं चुकीचं वक्तव्य केल्याप्रकरणी जान्हवीला रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर शिक्षा दिली होती. संपूर्ण आठवडाभर जेलमध्ये राहायचं, बाहेर यायचं नाही. तिथेच राहायचं, झोपायचं, जेवायचं असं रितेशने जान्हवीला सांगितलं होतं. या शिक्षेमुळे जेलमध्ये बसलेल्या जान्हवीला भोवळ आली होती. आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी पुन्हा एकदा घरात वावरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : इरिना झाली Eliminate! अरबाज-वैभवला अश्रू अनावर; सल्ला देत म्हणाली, “तुम्ही सगळे…”

जान्हवीला जेलबाहेर आलेलं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “जान्हवी बाहेर का आली… हिला ठेवा जेल मध्येच”, “बिग बॉस हा फेक गेम आहे जान्हवी कशी बाहेर आली”, “जान्हवीला दोन दिवसांत बाहेर काढलं”, “जान्हवी जेलमधून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाहेर आली” अशा कमेंट्स करत युजर्सनी जान्हवीला घरात आलेलं पाहून नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, जान्हवीला शिक्षा झाली असली तरीही सध्या ती ‘बिग बॉस मराठी’ची एक स्पर्धक आहे त्यामुळे ‘मानकाप्याची दहशत’ हा टास्क खेळण्यासाठी तिला जेलबाहेर काढलं असण्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi : जान्हवीला जेलबाहेर पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स

हेही वाचा : Video : “ग्रुप A ला ट्रॉफी उचलू देणार नाही…”, चुगली ऐकताच निक्की भडकली! पण, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

दरम्यान, आता या नव्या टास्कमध्ये नेमकं काय घडणार? याशिवाय निक्कीने भाऊच्या धक्क्यावर ग्रुप A सोडल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता घरातलं वातावरणं आणि मैत्रीची समीकरणं कशी बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi horror task in the house but netizens angry after seen jahnavi is out of jail sva 00