‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. गेल्या आठवड्यात समृद्धी जाधव घराबाहेर पडली होती. आता तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेजस्विनीला टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. परंतु, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं.

हेही वाचा >> “फक्त काहीच लोकांना दाखवण्याचा…” घरातून बाहेर पडलेल्या समृद्धी जाधवचे ‘बिग बॉस’वर गंभीर आरोप

हेही वाचा >> “गेली अनेक वर्ष…” प्रथमेश परबच्या वाढदिवशी त्याच्या कथित गर्लफ्रेंडने केलेली पोस्ट चर्चेत

तेजस्विनीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर बिग बॉसने निर्णय दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनीला पुढील खेळ खेळणे सोयीचे नसल्याने तिला बिग बॉसच्या घरातून तिला निरोप घ्यावा लागला आहे. ‘बिग बॉस’च्या येणाऱ्या भागात तेजस्विनी घरातून बाहेर पडणार आहे. तेजस्विनीला निरोप देताना घरातील सदस्यही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा >> Video: ‘बिग बॉस’च्या घरात जेवणावरुन वाद, अर्चनाने शिवच्या भरलेल्या ताटामधून चपाती उचलली अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्डद्वारे चार सदस्यांनी एन्ट्री घेतली आहे. राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जगन्नाथ या स्पर्धकांनी घरात केलेल्या एन्ट्रीमुळे आता घरातील समीकरणंही बदलल्याचं पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi injured tejaswini lonari left the house contestant gets emotional kak