Bigg Boss Marathi Irina Rudakova Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पाडला. यावेळी रितेश देशमुखने घरात गैरवर्तन करणाऱ्या सगळ्या सदस्यांची शाळा घेतली. शनिवारी भाऊचा धक्का सुरू होताच रितेशने जान्हवीची जबरदस्त शाळा घेतली. घरात केलेली चुकीची वक्तव्य, पॅडीचा अपमान या सगळ्या गोष्टींसाठी रितेशने तिला जाब विचारला. एवढंच नव्हे, तर जान्हवीला आठवडाभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे.

जान्हवीला आता संपूर्ण आठवडाभर ही शिक्षा भोगावी लागणार आहे. निक्कीला सुद्धा रितेशने “घरात चांगलं वागा नाहीतर, जेलमध्ये पुढचा नंबर तुमचा असेल” असं थेट सांगितलं आहे. याशिवाय अरबाजला सुद्धा भाऊच्या धक्क्यावर ताकीद देण्यात आली. त्यामुळे यंदाचा भाऊचा धक्का नेहमीपेक्षा काहीसा वेगळा ठरला.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Anjali Damania Statement
Anjali Damania : अजित पवारांचं नाव घेत अंजली दमानियांची टीका, “माझ्या तळपायाची आग मस्तकात..”
Bigg Boss 18 Shilpa shinde support to Digvijay singh rathee
Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…

दुसऱ्या दिवशी ( रविवार ) कार्यक्रमात ‘दुर्गा’ मालिकेची टीम आली होती. यापैकी दुर्गाने घरातील सदस्यांना प्रश्न विचारले आणि पुरुष सदस्यांसह रॅपिड फायर राऊंड खेळण्यात आला. तसेच आज भाऊच्या धक्क्यावर श्रेयस तळपदे व कंगना रणौत देखील आल्या होत्या. पुढे, रितेशने रविवारी चक्रव्यूह खोलीत निक्की आणि आर्याला पाठवलं होतं. निक्की तिच्याबद्दलच्या चुगल्या ऐकून भयंकर संतापली होती. “यापुढे मी ‘ग्रुप A’चा भाग नसेन” असं तिने सर्वांसमोर स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : Video : “ग्रुप A ला ट्रॉफी उचलू देणार नाही…”, चुगली ऐकताच निक्की भडकली! पण, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

इरिना घराबाहेर जाताना काय म्हणाली?

सगळे टास्क संपल्यावर अखेर एलिमिनेशनची वेळ झाली. सर्वात जास्त मतं मिळवून या आठवड्यात आर्या सेफ झाली आहे. यानंतर बॉटम ३ मध्ये अभिजीत, वैभव आणि इरिना होते. यापैकी अभिजीतला रितेशने आर्यानंतर सेफ केलं आणि वैभव-इरिनापैकी घराचा निरोप कोण घेणार? याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं. त्यानंतर या आठवड्यात इरिना एलिमिनेट झाल्याचं रितेशने जाहीर केलं. भावुक होत इरिनाने या घराचा निरोप घेतला.

इरिना जाताना सर्वांना निरोप देत म्हणाली, “तुमच्यासाठी काहीपण…! मी हा खेळ खेळण्यासाठी माझे १०० टक्के दिले. जर मी कोणाला दुखावलं असेल तर, प्लीज मला माफ करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा! नेहमी तुम्ही सगळे आहात तसेच वागा. सगळ्यांना ट्रॉफी हवीये… सगळ्यांना गेम खेळायचाय पण, तुम्ही जसे आहात तसेच राहा.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “रितेशला ठरवून कुणाचा अपमान करता येत नाही”, लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट; म्हणाली, “त्याच्या डोळ्यात…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : इरिना गेली घराबाहेर

दरम्यान, इरिनाने आपल्या म्युच्युअल फंडचा वारसदार वैभवला करत त्याच्या खात्यात ५० पॉईंट्स जमा केले आहेत. आता पाचव्या आठवड्यात घरातली ( Bigg Boss Marathi ) समीकरणं कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader