Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून दोन आठवड्यांपूर्वी परदेसी गर्ल इरिना रुडाकोवाने एक्झिट घेतली. इरिनाची घरात वैभव, अरबाज यांच्याबरोबर खूप चांगली मैत्री होती. त्यामुळे इरिना घराबाहेर आल्यावर दोघंही भावुक झाले होते. परंतु, एलिमिनेशन होण्याआधी घरात इरिना व निक्कीचे टोकाचे वाद झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
घरात झालेल्या भांडणामध्ये इरिनाने निक्कीला कोणतंही प्रतिउत्तर दिलं नाही. निक्की इरिनाला खूपच घालूनपाडून बोलली होती. या विरोधात शेवटी वैभवने इरिनासाठी स्टॅण्ड घेतला होता. “इरिना एलिमिनेट झाली पाहिजे, ती घराबाहेर जायली हवी, माझ्या ग्रुपमध्ये ती कधीच नव्हती” असं वक्तव्य निक्कीने इरिनाबद्दल केलं होतं. या सगळ्यावर परदेसी गर्लने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरला भाऊच्या धक्क्यावर नो एन्ट्री! शिक्षेची आठवण करून देत रितेश देशमुख म्हणाला…
Bigg Boss Marathi : इरिना काय म्हणाली ?
इरिना ( Bigg Boss Marathi ) म्हणाली, “निक्कीचं व्यक्तिमत्व, तिचं वागणं मला आवडलं नाही. तिचा रुबाब पण मला पटत नाही. मराठी मुलगी अशी नसते. मी सहा वर्षे मुंबईत राहिली आहे. त्यामुळे मला मराठी लोक कसे असतात हे माहिती आहे. तुम्ही लोकांना अशाप्रकारे हर्ट करू शकत नाही. तुझा गेम आहे मी मान्य करते. पण, सर्वात आधी आपण माणूस आहोत. ‘बिग बॉस’च्या घरात आपण कायम राहणार नाहीये. यामुळे पुढे जाऊन तिलाच त्रास होणार आहे.”
“मी काही चुकीचं बोलले असेन तर मला माफ करा पण, तिचं वागणं मला अजिबात पटत नाही. त्यांचं ( ए ग्रुप वैभव सोडून ) आणि माझं वागणं कधीच मॅच होऊ शकत नाही. मी टीम ‘ए’चा भाग कधीच नव्हते. त्यांच्यात माझा मित्र फक्त वैभव आहे.”
“मी जशी आत गेले तशीच बाहेर आले. मी घरात कधीही खोटं वागली नाही. वैभव, डीपी दादा, सुरज चव्हाण, अरबाज यांनी टॉप-५ मध्ये जावं असं मला मनापासून वाटतं.” असंही इरिनाने सांगितलं.