Bigg Boss Marathi Irina Rudakova : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून गेल्या आठवड्यात परदेसी गर्ल इरिना रुडाकोवा बाहेर पडली. इरिनाची घरात वैभव, अरबाज यांच्याबरोबर खूप चांगली मैत्री होती. त्यामुळे इरिना घराबाहेर आल्यावर दोघंही भावुक झाले होते. आता गेममधून बाहेर पडल्यावर इरिनाने पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत माझ्या अनेक चांगल्या गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीत. याबद्दल तिने खंत व्यक्त केली आहे. इरिना नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात..
इरिनाला तिच्या घरातील प्रवासाबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, “बाहेर आल्यावर मी सगळे एपिसोड पाहिले. मी घरात काय-काय केलं हे सुद्धा मी पाहिलं. सध्या घरात कसं वातावरण आहे याचा अंदाज घेतला. पण, खरं सांगू का मी अजिबात खोटं नाही बोलणार… मी प्रचंड नाराज आहे.”
हेही वाचा : बाईईई…! निक्की तांबोळीची भलतीच क्रेझ; चक्क पुणेकरांनी लगावले ठुमके; दहीहंडीचा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
इरिना घराबाहेर आल्यावर काय म्हणाली?
इरिना याबद्दल सांगताना पुढे म्हणाली, “मी घरात एकदम शांत होते… मला राग-राग, चिडचिड केलेली अजिबात आवडत नाही. मी घरात रोज योगा करायचे, स्विमिंग केलंय, ३० वगैरे नाहीतर जवळपास ६५ चपात्या मी केल्या आहेत. बोर्डावर मी मराठी लिहायचे…मी मराठी सुद्धा शिकून घेतलं. पण, या सगळ्या माझ्या चांगल्या गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीत. यासाठी मी खरंच थोडी नाराज आहे. मी दोन्हीपैकी कोणत्याही ग्रुपचा भाग नव्हते. मला घरात फक्त वैभवने सपोर्ट केला.”
“एका परदेशातल्या मुलीसाठी मराठी लिहायला शिकणं खूप कठीण आहे. कोबी, कॉफी, चिकन, मसाले असे शब्द मी लिहायला शिकले. याचा मला खूप जास्त अभिमान आहे आणि या सगळ्या गोष्टी आठवणी म्हणून मी कायम मनात ठेवेन.” असं इरिनाने सांगितलं. तसेच आर्यामुळे नॉमिनेट होऊन घराबाहेर ( Bigg Boss Marathi ) आल्याचं देखील इरिनाने स्पष्ट केलं.
हेही वाचा : Video: सलमान खानचा ‘जलवा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, मंचावर बसलेल्या अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया पाहिलीत का?
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात आता आधीसारखे ग्रुप न राहता संपूर्ण समीकरण बदलून गेलं आहे. या आठवड्यात ‘बिग बॉस’कडून व्होटिंग लाइन्स बंद ठेवण्यात आल्या आहेत.