Bigg Boss Marathi Fame Dhananjay Powar and Irina : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात यंदा स्पर्धेव्यतिरिक्त अनेकांची वैयक्तिक नाती जमली. सूरजला अंकितासारखी बहीण आणि पॅडीसारखा मोठा भाऊ मिळाला. तर, धनंजय पोवारला सुद्धा अंकिता आणि इरिनाच्या रुपात मानलेल्या बहिणी मिळाल्या. ही नाती या स्पर्धकांनी घराबाहेर पडल्यावर सुद्धा तेवढ्याच आपुलकीने जपली आहेत.

दिवाळीनिमित्त संपूर्ण देशभरात सध्या उत्साहाचं वातावरण आहे. रविवारी ( ३ नोव्हेंबर ) घराघरांत मोठ्या आनंदात भाऊबीज साजरी करण्यात आली. अंकिता काही दिवसांपूर्वीच डीपीच्या घरी जाऊन त्याला भाऊबीज करून आली. तर, इरिनाने भाऊबीजेच्या निमित्त धनंजय पोवारचा ( Bigg Boss Marathi ) एक खास व्हिडीओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
Ankita Walawalkar and Dhananjay Powar
होणाऱ्या नवऱ्यासह धनंजय पोवारच्या घरी पोहोचली अंकिता! लाडक्या डीपी दादांना केली भाऊबीज; फोटो आले समोर
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Bigg Boss Marathi fame Ankita walawalkar fish gift to Dhananjay powar for bhaubij
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने भाऊबीजनिमित्ताने धनंजय पोवारला दिलं हटके गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वहिनीला…”

हेही वाचा : सूरजकडे भाऊबीजेला नाही गेलीस? जान्हवी किल्लेकरच्या फोटोवर चाहत्याची कमेंट, अभिनेत्री म्हणाली…

डीपीसाठी इरिनाची खास पोस्ट

वैभव आणि इरिना ( Bigg Boss Marathi ) काही दिवसांआधी सूरजच्या मोढवे गावी आणि त्यानंतर कोल्हापुरात धनंजय पोवारच्या घरी गेले होते. डीपीच्या आई अन् पत्नीने इरिनाचं औक्षण करून त्यानंतर फुलांची उधळण करत तिचं स्वागत केलं होतं. यानंतर धनंजयने तिला काही मराठी संवाद देखील बोलायला शिकवले होते. याशिवाय डीपीने आपल्या लाडक्या बहिणीला कोल्हापुरची मिसळ खाऊ घातली होती. याचा खास व्हिडीओ इरिनाने भाऊबीजेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शेअर केला आहे.

डीपी या व्हिडीओमध्ये ‘परदेसी गर्ल’ इरिनाला मिसळ थाळी खायला देत असल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय या व्हिडीओमध्ये म्हणतो, “मी तुझ्यासाठी मिसळ आणलीये आणि तुझ्या एकटीसाठी आणलीये म्हणून वैभव जळतोय बघ…” यावर इरिना म्हणते, “बापरे…भावा तू माझ्यासाठी मिसळ आणलीस. किती प्रेम, नुसतं प्रेम, भरपूर प्रेम!”

हेही वाचा : Video : जान्हवी किल्लेकरनं दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केलं ‘Bigg Boss’चं खास ब्रेसलेट! व्हिडीओ शेअर करीत दाखवली झलक

हेही वाचा : कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”

कोल्हापुरात गेल्यावर धनंजयने केलेला पाहुणचार पाहून इरिना ( Bigg Boss Marathi ) प्रचंड भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “इरिना लय खुश झाली”, “इरिनाची मराठी भारी आहे बापरे…”, “ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती”, “डीपी दादा प्रेमळ माणूस”, “मजाच मजा इरिनाची” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या दोघांच्या बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओला अवघ्या एका दिवसात १९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader