Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या शोमध्ये पहिल्या दिवशीच घरात दोन गट पडले होते. यातील ‘ए’ ग्रुपमध्ये अरबाज, निक्की, जान्हवी, वैभव हे सदस्य होते. तर, निक्की आणि जान्हवी एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी होत्या. पहिल्या महिन्याभरात सख्ख्या मैत्रिणी असणाऱ्या या अभिनेत्री आता पक्क्या वैरी झाल्या आहेत.

निक्की तांबोळीला रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर तिच्याविषयी घरात काय-काय बोललं जातं याच्या क्लिप्स दाखवल्या होत्या. यामुळे तिचेच मित्र मागून काय बोलतात याचा अंदाज निक्कीला आला. तर, दुसरीकडे जान्हवीला सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आलं. याच दरम्यान, निक्की-जान्हवीची मैत्री तुटली. निक्कीने ग्रुप A मधून एक्झिट घेणार असल्याचं सर्वांसमोर सांगितलं. आता हळुहळू घरातली सगळी समीकरण बदलली आहेत.

Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli Amid Heavy Criticism on Poor Form
VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…
aap leader gopal italia news
AAP Leader Video: …आणि आप नेत्यानं अचानक कंबरेचा पट्टा काढून स्वत:लाच मारायला सुरुवात केली; नेमकं घडलं काय?
Vallari Viraj
Video: लीला, शिवा व सरूचा भन्नाट डान्स; वल्लरी विराजने शेअर केला व्हिडीओ, अभिनेत्रीच्या कमेंटने वेधले लक्ष
Bigg Boss Marathi Fame sonali patil dance on mala lagali kunachi uchaki song
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, हातात काठी घेऊन ऊसाच्या फडात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचा डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video: “वैभव आतापर्यंत ‘बिग बॉस’मध्ये बॉडीमुळे आहे”, निक्की तांबोळीचं विधान, अरबाजला म्हणाली…

निक्की-जान्हवीमध्ये वाद, नेमकं काय घडलं?

सध्या अरबाज-निक्की एकत्र खेळत असून त्यांच्या विरोधात संपूर्ण घर उभं राहिलं आहे. निक्कीने तर घरातलं कोणतंच काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यामुळे जर निक्कीने काम केलं नाहीतर तिला कोणत्याही सुविधांचा लाभ घेऊ द्यायचा नाही असं घरातल्या अन्य सदस्यांनी ठरवलं आहे. त्यामुळे जान्हवी सर्वांसमोर, “निक्की घरात काम करत नसल्याने मी बनवलेलं जेवण तिने खायचं नाही” असं निक्कीला थेट सांगते. यावरूनच आता दोघींमध्ये वाद होणार आहेत.

‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणते, “घे बनव स्वत:च्या हाताने आणि गिळ” पुढे निक्की प्रतिउत्तर देत म्हणते, “कोण आहे गं तू चल निकल… माझ्या वाकड्यात गेलात तर मी कसा गळा पकडेन हे माझ्याकडून शिकावं.”

हेही वाचा : Quiz : छोट्या पडद्यावर वादग्रस्त ठरणाऱ्या Bigg Boss Marathi शोबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? सोडवा ‘हे’ १० प्रश्न

दोघींमधली भांडणं वाढत जाऊन पुढे, जान्हवी म्हणते, “ही तर निर्लज्ज आहे…सगळं फुकट हवंय तिला” यानंतर निक्की सांगते, “तुमच्या छातीवर बसणार आहे इथे बघत राहा फक्त” निक्कीने जेवायला घेतल्याचं पाहातच जान्हवी तिला “अरे थोडी तरी लाज असेल तर मी बनवलेलं खाणार नाहीस…दुसऱ्याच्या ताटातलं.” असं सांगते.

Bigg Boss Marathi
नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Bigg Boss Marathi )

दरम्यान, निक्कीने घरात कोणतंही काम न करण्याची भूमिका घेतल्याने सध्या नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. “आता खरा टीआरपी चालू झाला”, “जान्हवीच निक्कीला सरळ करू शकते”, “हाच खेळ पाहायचाय सर्वांना” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

Story img Loader