Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस’च्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ टास्क संपल्यावर पंढरीनाथ कांबळेच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं होतं. टास्कदरम्यान सुरुवातीला निक्कीने त्याला ‘जोकर’ म्हटलं होतं. तर, त्यानंतर जान्हवीने पॅडीचा त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारर्किदीवरून अपमान केला. जान्हवीच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती.

विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, सिद्धार्थ जाधव, अभिजीत केळकर, सिद्धार्थ जाधव, मेघा धाडे यांनी स्पष्ट मत मांडत जान्हवीवर संताप व्यक्त केला. यासंदर्भात पॅडीची मुलगी ग्रीष्मा हिने देखील पोस्ट शेअर आपल्या वडिलांची बाजू स्पष्ट केली आहे. पॅडीचा अपमान केल्यावर दुसऱ्या दिवशी जान्हवीने या प्रकरणी स्वत:हून त्याची माफी मागितली आहे. यावेळी अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले होते.

trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”
Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही”, जान्हवीकडून पंढरीनाथचा अपमान; आर्याने जाब विचारताच म्हणाली, “जा फूट…”

जान्हवी एकटीच सोफ्यावर बसलेली असते. तिच्या डोळ्यात पाणी पाहून धनंजय तिच्याकडे जातो आणि जान्हवीला पाहून तुला काय झालं विचारतो? यावर जान्हवी, “मी गेम खेळताना अती बोलते दादा” असं म्हणत भावुक होते. पुढे, धनंजय तिला सांगतो, “ठिके आता कालचा दिवस गेला… आता नवीन दिवस उगवला आहे. आता हा खेळ आहे आणि आपण प्रतिस्पर्धी आहोत. तू भांडतेस ही चूक नाही पण, शब्द चुकतात. करिअरवरून बोलणं चुकीचं आहे” असं सांगून धनंजय तिला समजावतो.

जान्हवीने मागितली माफी ( Bigg Boss Marathi )

जान्हवी एकटीच गार्डनर एरियामध्ये रडत असते. धनंजय घडल्याप्रकाराबद्दल पॅडीला सांगतो. यावेळी पंढरीनाथ कांबळे जान्हवीकडे जातो आणि म्हणतो, “मला माहिती होतं की, तुला कधीतरी माझ्याशी या विषयावर बोलावंसं वाटेल.” हे ऐकल्यावर जान्हवी त्याला रडत-रडत सॉरी म्हणते. “माझं खरंच चुकलं” असं म्हणत अभिनेत्री हात जोडून माफी मागते.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : जान्हवीने मागितली माफी

पंढरीनाथ जान्हवीला सांगतो, “मी देवाकडे प्रार्थना केली होती की, देवाने तुला खूप मोठी अभिनेत्री बनवावं आणि तुला एवढा स्टॅण्ड घेता यावा की, या माणसाबरोबर मी काम करणार नाही. कारण, मी हे करू शकतो. मी विचारेन कोण-कोण आहे जान्हवी किल्लेकर आहे ना? बॉस मी काम नाही करणार! असं मी ठरवलं होतं पण, मी माणूस आहे, मी बाप आहे, मी भाऊ आहे. तर, झालं गेलं राहुदेत त्यामुळे ठिके आता तू रडू नकोस.”

“खेळात आपण जीव तोडून भांडूया, हा खेळ खेळूया फक्त एकमेकांचं करिअर…एक जो स्तर असतो तो निश्चित पाळूया. एकमेकांचा आदर ठेवून भांडूया” असं पंढरीनाथ कांबळेने जान्हवीला सांगितलं.

Story img Loader