Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. रितेशने दिलेल्या शिक्षेमुळे निक्की इथून पुढे कधीच घराची कॅप्टन होऊ शकणार नाही. त्यामुळे ती या कार्यात आपल्या मित्रांना सहकार्य करताना दिसत आहे. कॅप्टन्सी टास्कसाठी ‘बिग बॉस’कडून एकूण दोन टीम पाडण्यात आल्या आहेत. ‘ए टीम’मध्ये निक्की, अरबाज, वैभव, धनंजय, वर्षा आणि सूरज हे सहा सदस्य आहेत. तर, ‘बी टीम’मधून अभिजीत, जान्हवी, संग्राम, अंकिता, पॅडी आणि आर्या हे सहा सदस्य खेळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅप्टन्सी टास्कमध्ये घरातील ( Bigg Boss Marathi ) सगळे सदस्य एकमेकांना भिडताना दिसले. विशेषत: संग्राम आणि अरबाज या दोघांमध्ये या टास्कदरम्यान धक्काबुक्की, जोरदार भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही फेऱ्यांमध्ये निक्कीच्या टीमने बाजी मारत सुरुवातीला अभिजीत आणि संग्रामला बाद केलं. तर, दुसऱ्या फेरीत यांच्या टीमने जान्हवी आणि आर्याला बाद केलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : टास्कमध्ये धक्काबुक्की, जोरदार राडा…; अरबाजचं ‘ते’ रुप पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “संग्राम भाऊ…”

जान्हवी पहिल्या दिवसापासून तिचा खेळ ‘टीम ए’बरोबर खेळत होती. अरबाज, वैभव, निक्की हे तिघे तिचे जवळचे मित्र होते. मात्र, कालांतराने जान्हवी अन् निक्कीची मैत्री तुटली आणि आता जान्हवी वैयक्तिकरित्या तिचा गेम खेळताना दिसत आहे. तरीही, जान्हवीची अरबाज-वैभवबरोबर मैत्री कायम आहे. त्यामुळे अरबाजने कॅप्टन्सी उमेदवारीच्या लढतीतून बाद करणं जान्हवीला अजिबात पटलं नाही. याबद्दल टास्क संपल्यावर जान्हवीने दोघांकडे विचारपूस केली.

हेही वाचा : मुहूर्त ठरला! नवरात्रोत्सवात सुरू होणार ‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘उदे गं अंबे’; कोणती जुनी मालिका घेणार निरोप?

निक्की तांबोळी( Bigg Boss Marathi Season 5 )

जान्हवीने वैभव-अरबाजला स्पष्टच सांगितलं…

जान्हवीने वैभव आणि अरबाजला एकत्र बसवून “तुम्ही माझं नाव का घेतलं?” असा प्रश्न विचारला यावर वैभवने “तुला काढायचं हे निक्कीने ठरवलं होतं” असं उत्तर जान्हवीला दिलं. हे ऐकल्यावर जान्हवी म्हणते, “निक्कीला माझ्या कॅप्टन्सीबद्दल काय त्रास आहे? मला माहितीये मी आता एकटी खेळतेय… पण, आपल्यात एक मैत्रीचं नातं होतं ना? तुम्हाला मी आताच सांगतेय… यापुढे मी तुमच्या विरोधातच खेळणार आहे. त्यामुळे आता आपण एकमेकांच्या विरोधातच राहूया…”

कॅप्टन्सी टास्कमध्ये आपल्याच मित्रांकडून धोका मिळाल्याने जान्हवी प्रचंड नाराज झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता यापुढे जान्हवी अरबाज-वैभवशी असलेली मैत्री तोडणार की, तिघे गेमसाठी ( Bigg Boss Marathi ) पुन्हा एकत्र येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi jahnavi feel betrayal by own friends vaibhav says nikki is the reason watch promo sva 00