Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला. नको असणाऱ्या सदस्यांचे फोटो फाडून कचरा पेटीत टाकायचे असा टास्क ‘बिग बॉस’कडून घरातील सगळ्या सदस्यांना देण्यात आला होता. या दरम्यान, बहुतांश सदस्यांनी घन:श्यामला नॉमिनेट केलं. याशिवाय हा टास्क सुरू होण्यापूर्वी जान्हवी व घन:श्याम यांच्यात वैभववरून आधीच भांडण झालं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॉमिनेशन ( Bigg Boss Marathi ) कार्यात जान्हवीने, “घन:श्यामला खेळाची अजिबात समज नाहीये. तो दुसऱ्यांच्या डोक्याने चालतो. त्याला स्वत:ची अशी काहीच अक्कल नाही. खरंतर कुठे गेम खेळायचा आणि कुठे नाही खेळायचा याची त्याला अक्कल असायला हवी होती. त्याच्यामध्ये अजिबात खिलाडूवृत्ती नाहीये आणि त्याच्याकडे निर्णयक्षमता सुद्धा नाहीये” अशी कारणं देत छोट्या पुढारीला नॉमिनेट केलं. यानंतर या टास्कमध्येच दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “जान्हवीसाठी हे खूप Unfair…”, भाऊच्या धक्क्यावर बसू न दिल्याने अभिनेत्रीच्या जाऊबाईंची पोस्ट; संध्या किल्लेकर म्हणाल्या….

जान्हवी – घन:श्याममध्ये वाद

जेलची शिक्षा संपताच आता पुन्हा एकदा जान्हवीने तिचा खेळ सुरू केला आहे. अभिनेत्री आजच्या भागात घन:श्यामबरोबर पुन्हा एकदा जोरदार भांडण करताना दिसणार आहे. चिडलेली जान्हवी छोट्या पुढारीला म्हणते, “सगळ्यांना माहितीये की, तुझ्यात अक्कल नाहीये. तुला अख्ख्या घराने नॉमिनेट केलं.”

जान्हवीचं म्हणणं ऐकल्यावर घन:श्याम देखील भडकतो. तो म्हणतो, “मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आलीये.” यावर पुढे अभिनेत्री त्याला म्हणते, “तू बावळट आहेस, अक्कलशून्य आहेस तू” यानंतर “तुझ्या एवढा बावळट नाहीये… चल चल जा…” असं घन:श्याम जान्हवीला थेट सांगत असल्याचं या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : अरबाज पटेलबद्दल ‘ती’ पोस्ट, आता त्याच्या गर्लफ्रेंडने थेट बॉलीवूड अभिनेत्यासह शेअर केला फोटो, कॅप्शनने वेधले लक्ष

Bigg Boss Marathi

हेही वाचा : Video : निक्कीचा काम करण्यास नकार, नियमभंग अन्…, मनमानी कारभाराला सगळेच वैतागले, शेवटी आर्या म्हणाली…; पाहा प्रोमो

दरम्यान, जेलची शिक्षा संपल्यावर जान्हवीला घरात पुन्हा एकदा भांडताना पाहून नेटकऱ्यांनी या प्रोमोवर मतं व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. “एका माळेतले मनी”, “हे दोघंही सारखेच आहेत”, “याला काढा रे बाहेर खूप आगाऊ आहे. “खरंच याला काहीच कळत नाही मुळात अक्कलच नाही”, “जान्हवी कधीच सुधारणार नाही दोघंही सारखेच आहेत” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी जान्हवी – घन:श्यामची भांडणं पाहून दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi jahnavi huge fight with ghanshyam darode watch promo sva 00