Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये निक्की व जान्हवी वैयक्तिक विषयावर भाष्य करत घरातील इतर सदस्यांचा अपमान करतात असा आरोप नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारांनी केला आहे. जान्हवीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात पंढरीनाथ कांबळेचा अभिनय कारकि‍र्दीवरून अपमान केला. यावरून सोशल मीडियावर अभिनेत्रीबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आता जान्हवीचे पती किरण किल्लेकर तिच्या मदतीसाठी धावून आले आहेत.

किरण किल्लेकर यांनी पोस्ट शेअर करत जान्हवीला पाठिंबा दिला आहे. करिअरबद्दल बोलणं योग्य नाही पण, घरातले इतरही सदस्य चुकतात असं किरण यांनी त्यांच्या पोस्टमधून सुचित केलं आहे.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
Bigg Boss 18 Bigg Boss angry after Vivian dsena can chum darang refused to accept the ticket to final
Bigg Boss 18: विवियन डिसेना, चुम दरांगच्या ‘या’ निर्णयामुळे भडकले ‘बिग बॉस’; सर्व सदस्यांना दिल्या दोन शिक्षा
chandrashekhar bawankule reacts on valmik karad case and supriya sule statement
वाल्मिक कराड प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रकरणावर लक्ष; दोषी आढळल्यास कारवाई अटळ, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”

किरण किल्लेकर यांची पोस्ट ( Bigg Boss Marathi )

जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही. पण, जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली.

याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे ती नक्कीच चुकली आहे. ‘बिग बॉस’चं घर साधं घर नाही. तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत असं ही नाही. तिथे गेल्यानंतर लोक बदलतात त्यांची वागण्याची पद्धत बदलते. याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही.

लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची… बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी या बाईचा १ दिवस पाणउतारा करेन. अंकिता बोलते हिच्या मध्येच खूप खोडी आहेत अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू तेव्हा कुठे गेलेले आदर्श… तेव्हा वर्षा ताई सिनिअर नव्हत्या म्हणजे?

जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले पण, तिने नंतर वर्षा ताईंची माफी मागून त्यांची सेवा केली. हे फक्त फुटेजसाठी असतं असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा, २४ तासांच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते. ती १ तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका. ‘बिग बॉस’चा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा बस्स बोलायला खूप आहे. पण, जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक माझ्या या विषयाला आता आगीसारखं पसरवतील आणि काही तरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेछा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो.

मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळुहळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी.

किरण किल्लेकर #isupportjahnavi

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “रितेश भाऊ हे अक्षम्य…”, निक्की-जान्हवीवर मराठी अभिनेत्याचा संताप; पंढरीनाथबद्दल म्हणाला, “तू आतमध्ये भीड…

bigg boss marathi
जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्याची पोस्ट ( Bigg Boss Marathi )

दरम्यान, आता येत्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख जान्हवीची काय शाळा घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय ‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) च्या घरात या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार, कोणावर एलिमिनेशनची टांगती तलवार असेल हे देखील लवकरच स्पष्ट होईल.

Story img Loader