Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये निक्की व जान्हवी वैयक्तिक विषयावर भाष्य करत घरातील इतर सदस्यांचा अपमान करतात असा आरोप नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारांनी केला आहे. जान्हवीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात पंढरीनाथ कांबळेचा अभिनय कारकिर्दीवरून अपमान केला. यावरून सोशल मीडियावर अभिनेत्रीबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आता जान्हवीचे पती किरण किल्लेकर तिच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
किरण किल्लेकर यांनी पोस्ट शेअर करत जान्हवीला पाठिंबा दिला आहे. करिअरबद्दल बोलणं योग्य नाही पण, घरातले इतरही सदस्य चुकतात असं किरण यांनी त्यांच्या पोस्टमधून सुचित केलं आहे.
किरण किल्लेकर यांची पोस्ट ( Bigg Boss Marathi )
जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही. पण, जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली.
याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे ती नक्कीच चुकली आहे. ‘बिग बॉस’चं घर साधं घर नाही. तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत असं ही नाही. तिथे गेल्यानंतर लोक बदलतात त्यांची वागण्याची पद्धत बदलते. याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही.
लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची… बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी या बाईचा १ दिवस पाणउतारा करेन. अंकिता बोलते हिच्या मध्येच खूप खोडी आहेत अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू तेव्हा कुठे गेलेले आदर्श… तेव्हा वर्षा ताई सिनिअर नव्हत्या म्हणजे?
जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले पण, तिने नंतर वर्षा ताईंची माफी मागून त्यांची सेवा केली. हे फक्त फुटेजसाठी असतं असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा, २४ तासांच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते. ती १ तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका. ‘बिग बॉस’चा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा बस्स बोलायला खूप आहे. पण, जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक माझ्या या विषयाला आता आगीसारखं पसरवतील आणि काही तरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेछा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो.
मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळुहळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी.
किरण किल्लेकर #isupportjahnavi
हेही वाचा : Bigg Boss Marathi – “रितेश भाऊ हे अक्षम्य…”, निक्की-जान्हवीवर मराठी अभिनेत्याचा संताप; पंढरीनाथबद्दल म्हणाला, “तू आतमध्ये भीड…”
दरम्यान, आता येत्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख जान्हवीची काय शाळा घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय ‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) च्या घरात या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार, कोणावर एलिमिनेशनची टांगती तलवार असेल हे देखील लवकरच स्पष्ट होईल.