Bigg Boss Marathi Jahnavi Killekar & Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याची भेट घेण्यासाठी त्याचे असंख्य चाहते तसेच सहस्पर्धक सध्या सूरजच्या गावी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतीच अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सूरजच्या गावी गेली होती. भाऊबीजेनिमित्त आपल्या लाडक्या भावाचं औक्षण करण्यासाठी जान्हवी मोढवे गावी आपल्या कुटुंबीयांसह गेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात जान्हवीने सूरजला राखी बांधली होती. त्यामुळे भाऊबीजेला सुद्धा तुझ्याघरी येईल असं तेव्हा अभिनेत्रीने या ‘गुलीगत किंग’ला सांगितलं होतं. अखेर जान्हवीने तिचा शब्द खरा करून दाखवला आहे. ती सगळ्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढून सूरजच्या गावी गेली होती. यावेळी सूरजने लाडक्या बहिणीला संपूर्ण गाव फिरवलं. या दोघांनी एकत्र आल्यावर धमाल केल्याचं पाहायला मिळालं. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : दिवाळीनिमित्त सूरजच्या गावी पोहोचले Bigg Boss Marathi 5 मधले ‘हे’ सदस्य! फोटो आला समोर, नेटकरी म्हणाले, “तुमची दोस्ती…”

जान्हवीने यादरम्यान ‘चांगभलं बातम्या’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यातल्या अनेक व्हिडीओ क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी अभिनेत्रीला “घन:श्यामने सूरजसाठी मुलगी पाहिलीये, तशी तुमच्या नजरेत कोणी आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जान्हवी आणि सूरज म्हणाले, “घन:श्यामवर कोणीही विश्वास ठेऊ नये. तो प्रचंड फसवतो.”

“माझ्या डोक्यात सध्या तरी सूरजच्या लग्नाबद्दल काहीच नाहीये. पण, तो स्वत:साठी चांगली मुलगी नक्की शोधेल आणि मला दाखवेल. फक्त ती मुलगी त्याला हवी तशी, त्याच्या चॉइसची असावी असं मला वाटतं.” असं जान्हवीने सांगितलं.

हेही वाचा : Video : लाडक्या लेकाची दिवाळी सुट्टी संपली…; ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील छोट्या सिम्बाच्या आईला अश्रू अनावर

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मधुराणी प्रभुलकर झाली भावुक; म्हणाली, “प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका…”

दरम्यान, सूरजच्या ( Bigg Boss Marathi ) गावी जाऊन जान्हवीने लाडक्या भावाबरोबर खास फोटोशूट देखील केलं आहे. सूरजला भाऊबीज केल्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने याला “तू फक्त एक हाक मार मी कायम तुझ्याबरोबर आहे” असं कॅप्शन दिलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan slams ghanshyam darode watch video sva 00