Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यामुळे घरातलं संपूर्ण समीकरण बदलून गेलं आहे. घरात ‘ए’ टीममध्ये उभी फूट पडली आहे. रविवारच्या भागात रितेशने निक्कीला चक्रव्यूह खोलीत तिच्याविषयी मागून काय बोललं जातं याच्या क्लिप्स दाखवल्या. ‘बिग बॉस’ने दाखवलेले व्हिडीओ पाहून निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. कारण, सगळी तिचीच मित्रमंडळी तिच्या मागून गॉसिप करत निक्की कशी चुकीचं वागतेय यावर चर्चा करत होती. चक्रव्यूह खोलीतून बाहेर येताच “मी ‘टीम ए’मधून एक्झिट घेतेय” असं निक्कीने सर्वांना सांगितलं होतं.

निक्की तिच्या विरोधात केलेल्या चुगल्या पाहून अरबाज, वैभव, जान्हवी, घन:श्याम या तिघांवरही संतापली आहे. एकीकडे निक्कीने आपल्याच मित्रांशी वैर घेतलं असलं, तरीही घरात तिचं आर्याशी देखील अजिबात जमत नाही. सध्या घरात आर्याला ‘बी टीम’कडून दूर करण्यात आलं आहे. याचाच फायदा घेत आता आर्या, अरबाज अन् जान्हवी या दोघांबरोबर हातमिळवणी करत असल्याचं पाहायला मिळणार आहे.

Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Vide: निक्की तांबोळीमुळे टीम बीमध्ये होणार कल्ला; अंकिता वालावलकरने जाब विचारताच, धनंजय पोवार म्हणाला, “मी तुमच्याशी…”

आर्या सर्वांना सांगते, “आता सगळ्यांचा मेन दुश्मन एकच आहे ती म्हणजे निक्की…” यावर अरबाज म्हणतो, “तुला निक्कीला त्रास द्यायचा आहे ना? पण, तू निक्कीला कितीही त्रास दे तिला फरक नाही पडणार… मात्र, तू अभिजीतला त्रास दिल्यावर निक्कीला लगेच फरक पडेल.”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

जान्हवी किल्लेकरने बदलला गेमप्लॅन

याशिवाय आर्या जान्हवीशी संवाद साधताना म्हणते, “तू आता या ठाम निर्णयावर आली आहेस की, तुला निक्कीबरोबर नाही बोलायचंय. तुझं परवापर्यंत हे फिक्स नव्हतं. जर तुझ्यात एवढे बदल झालेत…तर तुझी जी खरी ओळख आहे ती नक्कीच लोकांना दिसेल. जान्हवी नक्की काय आहे हे लोकांसमोर तुझ्या पुढच्या अ‍ॅक्शनवरूनच स्पष्ट होईल. कारण, सगळ्यांना घराला खरी जान्हवी बघायची आहे.” पुढे जान्हवी म्हणते, “माझा गेम एकदम क्लिअर होता. मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी निक्कीच्या विरोधात कचाकचा भांडू शकते.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi- ‘बिग बॉस’मध्ये मानकाप्याची दहशत! पण, जेलमधल्या जान्हवीला घरात पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “दोन दिवसांत…”

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) या दोन्ही प्रोमोवरून घरातील बहुतांश सदस्य निक्कीच्या विरोधात खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता निक्कीला या कठीण काळात अभिजीत साथ देणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता संपूर्ण पाचवा आठवडा जान्हवीला जेलमध्ये काढायचा आहे. जेलमध्ये टाकल्यावर तिने स्वत:चा संपूर्ण गेम बदलल्याचं पाहायला मिळत आहे. आता जान्हवी येत्या काळात कोणती भूमिका घेणार? ती इतरांशी कशी वागणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे.

Story img Loader