Bigg Boss Marathi Jahnavi Killekar Exit : ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेला मोठ्या दणक्यात सुरुवात झालेली आहे. रितेश देशमुखने जवळपास २ आठवड्यांनी भाऊच्या धक्क्यावर पुनरागमन केलं आहे. घरात आल्यावर सर्वप्रथम रितेश देशमुखने सर्व स्पर्धकांचं कौतुक केलं. यानंतर पहिल्या एव्हिक्शनसाठी अभिनेत्याने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली.

रितेशने पहिल्या एव्हिक्शनसाठी घरात एन्ट्री घेतल्यावर सगळ्या सदस्यांना अ‍ॅक्टिव्हिटी एरियामध्ये बोलावण्यात आलं. यानंतर स्पर्धकांसमोर तब्बल ९ लाख रुपये असणाऱ्या दोन बॅगा ठेवण्यात आल्या. “जर बझर वाजवून या बॅगा उचललात तर, हे पैसे तुमचे होतील अन्यथा मी एलिमिनेट होणाऱ्या सदस्याचं नाव जाहीर करतो” असं रितेशने जाहीर केलं.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

हेही वाचा : Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live : ग्रँड फिनालेतून दुसरं Eviction! अंकिता घराबाहेर, टॉप – ४ स्पर्धक ठरले…

जान्हवीने थोडावेळ वाट पाहिली आणि काही वेळातच ती बझरकडे जाऊन उभी राहिली. अभिनेत्री भावुक होत म्हणाली, “या सीझनमध्ये मी फार चुकीचं वागले. मी उद्धट बोलले, मोठ्यांचा अपमान केला. मला माहितीये की, लोकांचा राग शांत झालेला नाहीये. हा गेम आहे आणि हा बिग बॉसने दिलेला एक टास्क आहे. टास्क पूर्ण नाही केला, तर बिग बॉस चिडतात. मी प्रायश्चित म्हणून हा बझर वाजवते आणि हा खेळ सोडते.”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

जान्हवीने ९ लाखांची Money बॅग उचलून हा खेळ सोडला आहे. बाहेर येताच रितेशने तिच्या कुटुंबीयांची याबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर तिचे पती किरण किल्लेकर म्हणाले, “तिचा निर्णय परफेक्ट होता. तू आमच्यासाठी विनर आहेस.” याशिवाय रितेशने जर ही बॅग उचलली नसती, तरीही जान्हवी सहाव्या क्रमांकावर बाद झाली असती असं जाहीर केलं. यानंतर सर्वांनीच तिच्या निर्णयाचं कौतुक केलं.

Story img Loader