Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतीच ‘बिग बॉस’ने यंदाचं पर्व ७० दिवसांमध्ये संपणार असल्याची घोषणा घरात केली आहे. ग्रँड फिनालेसाठी आता फक्त २ आठवडे बाकी आहेत. ६ ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे साहजिकच आता घरात राहिलेले आठ सदस्य या शोमध्ये आपलं स्थान आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरात आताच्या घडीला अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, पंढरीनाथ, वर्षा, निक्की आणि धनंजय असे एकूण आठ सदस्य आहेत. फिनाले अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे येत्या आठवड्यात हे सगळे सदस्य नॉमिनेट आहेत. त्यामुळे या आठवड्यात स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सगळ्या सदस्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल.

हेही वाचा : Video: “मी या लोकांसमोर झुकणार नाही”, अरबाज घराबाहेर पडल्यानंतर निक्की तांबोळीचा निर्धार, म्हणाली, “माझं साम्राज्य…”

जान्हवीला टास्कदरम्यान दुखापत

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात आज लगोरीचा खेळ काहीशा हटके पद्धतीने खेळण्यात येणार आहे. या टास्कसाठी ८ सदस्य दोन गटांमध्ये विभागले जाणार आहेत. या टास्कमध्ये प्रत्येकाने आक्रमक रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, हा लगोरीचा खेळ जान्हवी किल्लेकरला चांगलाच भारी पडल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

लगोरी टास्कमध्ये जान्हवीला दुखापत होणार आहे. ती अचानक खाली पडते आणि दुखापत झाल्याने जोरात ओरडत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. यानंतर जान्हवीच्या अवतीभोवती घरातील अन्य सदस्य देखील तिची विचारपूस करण्यासाठी गोळा होतात. आता जान्हवीला नेमकं किती लागलंय हे प्रत्यक्ष एपिसोड प्रसारित झाल्यावर स्पष्ट होईल. मात्र, गेल्या आठवड्यात सुद्धा नॉमिनेशन टास्कमध्ये जान्हवीच्या हाताला दुखापत झाली होती.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : मालक अन् सांगकाम्या! Bigg Boss ने टास्क जाहीर करताच निक्कीने थेट जोडले हात; तर जान्हवीने…; पाहा व्हिडीओ

Bigg Boss Marathi : घरात पार पडणार लगोरीचा टास्क

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’बद्दल सांगायचं झालं, तर सध्या या शोला प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे. घरातून गेल्या आठवड्यात अरबाज पटेलने कमी मतं मिळाल्याने एक्झिट घेतली. यानंतर निक्की प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

आता घरात राहिलेल्या ८ सदस्यांमध्ये अंतिम फेरीपर्यंत ( Bigg Boss Marathi ) कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. याशिवाय या आठवड्यात घरात फॅमिली वीक पार पडणार की नाही याबाबत देखील प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi jahnavi killekar injured during task watch new promo sva 00