Bigg Boss Marathi Jahnavi Insult Paddy kamble : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ या पहिल्याच टास्कमध्ये दोन्ही ग्रुपच्या सदस्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही ग्रुपच्या सदस्यांना या टास्कमध्ये बीबी करन्सी जमा करता आलेली नाही आणि याचे परिणाम या आठवड्यात भोगावे लागतील असा इशारा बिग बॉसने दोन्ही टिमला दिला आहे. टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात. परंतु, कोणीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका असं रितेशने भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट केलं होतं. मात्र, जान्हवीने नेहमीप्रमाणे सगळ्या मर्यादा ओलांडून पंढरीनाथ म्हणजे पॅडीच्या अभिनय क्षेत्रातील करिअर बोट ठेवत त्याचा अपमान केला आहे.

जान्हवी म्हणते, “हे लोक सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात तोंडासमोर येऊन बोलण्याचा दम नाहीये. यांना फक्त अ‍ॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले म्हणून ती अ‍ॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.”

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”

हेही वाचा : “बायकांना हडतूड करणारे…”, अरबाज पटेलच्या ‘त्या’ कृत्याचा मराठी अभिनेत्याने केला निषेध; म्हणाला, “केकाटणारे मर्द…”

जान्हवीने पुन्हा पातळी ओलांडली

यावर लिव्हिंग एरियामध्ये वर्षा ताईंना पॅडी सांगतो, “ही आपल्या अ‍ॅक्टिंगवर वगैरे बोलतेय हिला या गोष्टी बाहेर एवढ्या भोवतील…खूप त्रास होईल. कारण, आम्ही एका इंडस्ट्रीत आहोत आणि कधी ना कधी नक्कीच क्लॅश होणार… आय होप तिने असा स्टॅण्ड घेतला पाहिजे की, पॅडी कांबळे असेल तर मी काम करणार नाही. तिने हा स्टॅण्ड नाही घेतला तरीही मी हे नक्कीच करू शकतो.”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरने केला पॅडीचा अपमान ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

आर्या यानंतर जान्हवीला तिने केलेल्या वक्तव्याबद्दल जाब विचारायला जाते. यावर जान्हवी तिला “मी फाल्तू माणसांना रिप्लाय देत नाही” असं सांगते. यानंतर आर्या तिला “तू जेवढं काम केलं नाहीये…तेवढी त्यांनी अ‍ॅक्टिंग केलीये. त्यांचा एक स्टेटस आहे…त्यांनी खूप काम केलंय त्यामुळे उगाच कोणाच्या करिअरवर जाऊ नकोस. इथे तू आधीच घाण करतेय पण, कोणाच्या करिअरवर केलेलं भाष्य ऐकून घेणार नाही.” असं स्पष्टपणे बजावते.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : निक्कीच्या निर्णयामुळे ‘ए’ टीममध्ये पडली फूट, वैभव-घनःश्यामने उठवला आवाज, म्हणाले, “हिच्या वागण्यामुळे टीमचा घात”

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

आर्याने एवढं सांगूनही जान्हवी तिला “फूट…जा तुझी गँग घेऊन ये जा” असं सांगते. आत बसलेल्या पॅडीला आर्या त्यांच्यासाठी भांडतेय हे समजताच ते पटकन बाहेर जातात आणि “तू आत चल बाळा…” असं प्रेमाने सांगत आर्याला जान्हवीपासून दूर घरात घेऊन जातात.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांच्या कमेंट्स

नेटकऱ्यांनी एपिसोड संपल्यावर जान्हवीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली. वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केल्याने जान्हवीबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader