Bigg Boss Marathi Jahnavi Killekar And Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून आता जवळपास महिना उलटला आहे. तरीही या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाची लोकप्रियता कायम आहे. यंदाच्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने नाव कोरलं. गेल्या दोन ते तीन महिन्यांत त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. याशिवाय ‘बिग बॉस’च्या घरात सूरजला त्याच्या सहस्पर्धकांनी सुद्धा भक्कमपणे पाठिंबा दिला.

सूरज अत्यंत बेताच्या परिस्थितीतून आयुष्यात एवढा पुढे आला आहे. लहानपणीत त्याच्या डोक्यावरून आई-बाबांचं छत्र हरपलं. त्यानंतर बहि‍णींनी त्याचा सांभाळ केला. यादरम्यान त्याचं शालेय शिक्षण अर्धवट राहिलं. त्यामुळे शोमध्ये प्रवेश केल्यावर त्याला टास्क समजून घेण्यात सुरुवातीला प्रचंड अडचण व्हायची. या सगळ्या परिस्थितीत अंकिता वालावलकर, पॅडी कांबळे या मंडळींनी त्याला पहिल्या दिवसापासून खंबीरपणे साथ दिली.

bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
bigg boss marathi irina rudakova wishes happy bhaubeej to dhananjay powar
“Happy भाऊबीज भावा”, कोल्हापुरात धनंजय पोवारने केलेला पाहुणचार पाहून इरिना भारावली! म्हणाली, “नुसतं प्रेम…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा : कुजलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृतदेह, दुर्गंधीमुळे घटना उघडकीस, पोलिसांची प्रतिक्रिया आली समोर

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात प्रवेश केल्यावर सुरुवातीच्या काही दिवसांत जान्हवी किल्लेकर आणि सूरजमध्ये प्रचंड वाद झाले होते. मात्र, कालांतराने या दोघांच्या वादाचं रुपांतर भावा-बहिणीच्या सुंदर अशा नात्यात झालं. जान्हवीचा मुलगा तिला भेटण्यासाठी घरी आल्यावर सूरजशी त्याच्याशी एकदम छान गट्टी जमली होती. यानंतर अलीकडेच अभिनेत्री सूरजला भेटण्यासाठी त्याच्या मोढवे गावी गेली होती.

सूरजला पाहताच क्षणी जान्हवीने त्याला मिठी मारली. ‘गुलीगत किंग’ देखील आपल्या मानलेल्या बहिणीला पाहून प्रचंड आनंदी झाला होता. जान्हवीने त्याच्या घरातील सर्वांची विचारपूस केली, सूरजचे अनेक किस्से देखील सर्वांना सांगितले. या दोघांनी एकमेकांना भाऊ-बहीण मानलं आहे त्यामुळे अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करत तिला एका चाहत्याने भाऊबीजेसंदर्भात प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा : Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी

Bigg Boss Marathi
जान्हवी किल्लेकरने चाहत्याला दिलं उत्तर ( Bigg Boss Marathi )

जान्हवीने ( Bigg Boss Marathi ) भाऊबीज साजरी केल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावर एक चाहता प्रश्न विचारत म्हणाला, “सूरजला भाऊबीजेला ओवाळणी करायला गेली नाहीस का?” यावर जान्हवीने लवकरच जाणार आहे असं उत्तर दिलं आहे. आता जान्हवी आपल्या या मानलेल्या भावाची भाऊबीजेसाठी भेट केव्हा घेणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत.

Story img Loader