V
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
J
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळते. सध्या तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओची मोठी चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जान्हवी किल्लेकरने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
माहेरी स्वागत
जान्हवीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना जान्हवीने ‘माहेरी स्वागत’, असे लिहिले आहे. जान्हवी माहेरी गेली असून, तिचे हळद-कुंकु लावून, आरती ओवाळून स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. आरतीच्या आधी तिने पायातील चप्पल काढून बाजूला ठेवल्याचे दिसत आहे. ओवाळणी झाल्यानंतर तिने तिच्या मुलालादेखील पाया पडायला लावल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. तिचा हा व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओवर खारी हे गाणे लावले आहे. आता नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले नेटकरी?
जान्हवीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले आहे. तिच्यातील हे बदल सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “निगेटिव्ह लोकांना आज पॉझिटिव्ह केलं. वेगळंच रसायन आहे तुझ्यात. सोपं नाही महाराष्ट्राला जिंकणं.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “बिग बॉसमध्ये निगेटिव्ह दिसली; पण तुझं मन खरंच खूप छान आहे ताई. छान, खूप प्रेम.” आणखी एका नेटकऱ्याने, “ताई, तुम्ही आपल्या भारतीय संस्कृती जपता”, असे म्हणत तिचे कौतुक केले आहे.
याबरोबरच, “तुझा शेवटचा नऊ लाख घेण्याचा निर्णय मला खूप आवडला तेव्हापासून मी तुझी चाहती झाली आहे. तू खूप हुशार आहेस जान्हवी. तुझ्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे”, “सूरजनंतरचा लकी माणूस म्हणजे जान्हवी”, “असं प्रेम कुणालाही मिळत नाही जान्हवी. तू खूप नशीबवान आहेस”, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे पाहायला मिळत आहे.
जान्हवी किल्लेकरचा बिग बॉसमधील प्रवास
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात जान्हवी सहभागी झाली होती. या पर्वात सहभागी झाल्यापासूनच ती मोठ्या चर्चेत आली होती. जान्हवी किल्लेकर तिच्या विधानामुळे, निक्की, अरबाज, वैभव यांच्याबरोबरच्या मैत्रीमुळे आणि तिच्या टास्क खेळण्यामुळे सतत चर्चेत होती. तिच्या खेळावर प्रेक्षकांसह कलाकारांनीदेखील प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. तिच्यावर मोठी टीकादेखील झाल्याचे दिसले. मात्र, शोच्या शेवटी जान्हवीने नऊ लाख घेत शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाचे मोठे कौतुक झाले. जान्हवी सहाव्या स्थानावरून बिग बॉस मराठीच्या शोमधून बाहेर पडली.
दरम्यान, बिग बॉस मराठी ५ नंतर जान्हवी किल्लेकर मोठ्या चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या संपर्कात असते. याबरोबरच विविध कार्यक्रमांनादेखील ती हजेरी लावताना दिसते. नुकतीच ती सूरज चव्हाणच्या घरी गेल्यामुळे चर्चेत आली होती. आता बिग बॉस मराठीनंतर ती कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.