Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सुरू होऊन आता जवळपास महिना उलटला आहे. गेल्या महिन्याभरात घरात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. जान्हवी किल्लेकर, निक्की, अरबाज, वैभव यांची ‘ए’ टीम घरात केलेल्या भांडणांमुळे विशेष चर्चेत राहिली. एवढंच नव्हे, तर पॅडीचा अपमान केल्याने रितेश देशमुखने जान्हवीला जेलमध्ये देखील टाकलं होतं. आठवडाभर शिक्षा भोगल्यावर जान्हवीला जेलच्या बंधनातून मुक्त करण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जान्हवीला ‘बिग बॉस’ने शिक्षा भोगून झाल्यावर जेलच्या बाहेर येण्याची परवानगी दिली. यानंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांची माफी मागितली. परंतु, शिक्षा पूर्ण होऊनही रितेश देशमुखने तिला भाऊच्या धक्क्यावर स्थान दिलं नाही. शनिवारी रितेशने “जान्हवी मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे तुम्ही भाऊच्या धक्क्यावर बसू शकत नाही. त्यामुळे बाहेर चला…तुम्ही गार्डन एरियामध्ये जाऊन बसा.” असं तिला सांगितलं यावर आता अभिनेत्रीच्या जाऊबाईंनी पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : निक्कीचा काम करण्यास नकार, नियमभंग अन्…, मनमानी कारभाराला सगळेच वैतागले, शेवटी आर्या म्हणाली…; पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi : जान्हवीच्या जाऊबाईंची पोस्ट

जान्हवीच्या जाऊबाई संध्या किल्लेकर यांची पोस्ट

घरातील वस्तूंची आदळआपट करुन Bigg Boss Houseचे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण, भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे.

टास्कमध्ये आक्रमकता दाखवून Physically Violent होण्याला शिक्षा तर नाहीच पण, भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे…

घरातीलच एका सदस्यावर शिवीगाळ करून Bip Bip.. ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा पण साधी चर्चाही नाही. पण, भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे.

आणि जान्हवीने केलेल्या चुका तिने मान्य करूनही, घरातील व प्रेक्षकांची मनापासून माफी मागूनही, प्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही…

हे खरंच खूप Unfair आहे जान्हवीसाठी… घरातील इतर सदस्यांप्रमाणे तिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाणार का? गौतमी पाटीलने दोन शब्दात दिलं उत्तर, सूरज चव्हाणला शुभेच्छा देत म्हणाली…

दरम्यान, संध्या यांनी शेअर केलेल्या पोस्टवर जान्हवीच्या चाहत्यांनी सहमती दर्शवली आहे. “तिने चूक केली, त्याची शिक्षा पूर्ण केली त्यामुळे तिला आता धक्क्यावर बसू न देणं योग्य नाही”, “मॅडम तुमच्या मताशी सहमत आहे” अशा कमेंट्स संध्या यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi jahnavi sister in law sandhya killekar post about riteish deshmukh banned her from bhaucha dhakka sva 00