Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा खेळ सध्या खूपच रंजक वळणावर जाऊन पोहोचला आहे. पहिल्या दिवसांपासून ‘टीम ए’मध्ये असणारी मैत्री आता कायमची तुटली आहे. कॅप्टन्सी टास्कच्या पहिल्या फेरीतच जान्हवीने अरबाजला शर्यतीतून बाद करत इथून पुढे ती वैयक्तिकरित्या खेळेल असं स्पष्टपणे सर्वांना सांगितलं. टास्कमध्ये पहिल्याच फेरीत बाद केल्याने अरबाज-जान्हवीमध्ये वाद देखील झाले.

कॅप्टनपदासाठी उमेदवार म्हणून अरबाज, सूरज, वर्षा, वैभव आणि धनंजय असे पाच सदस्य दावेदार होते. यापैकी जान्हवीने पहिल्या फेरीत अरबाजला बाद केलं. तर, दुसऱ्या फेरीत वैभवने सूरजला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, तिसऱ्या फेरीपूर्वी घरात मोठा राडा होऊन आर्याने निक्कीला कानशि‍लात मारल्याची घटना घडली. यानंतर हा खेळ थांबवण्यात आला.

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी”, अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बाबा…”

जान्हवीने केला निर्धार

निक्की-अरबाजला या टास्कमध्ये बहुमत नव्हतं. त्यामुळे निक्की प्रचंड संतापली होती. घरात सगळीकडे तिचा मनमानी कारभार सुरू होता. यानंतर खेळ थांबवण्यात आल्यावर जान्हवी घरातील अंकिता, धनंजय आणि पॅडीशी संवाद साधताना म्हणाली, “ट्रॉफी मिळो न मिळो, मला हिचा गर्व उतरवायचाय. आता ती हतबल झालीये”

अंकिता यावर म्हणाली, “आम्ही उलटं तिला सांगत होतो… तू आम्हाला फुटेज देऊ नकोस बाहेर जा.” घरात घडलेला प्रकार पाहून धनंजय म्हणाला, “आता कुठे कॅप्टन्सी येईल असं वाटत होतं तेवढ्यात घरात हे राडे झाले. हाता तोंडाशी आलं होतं…सगळं गेलं”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : धनंजय व अंकिता ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “संग्रामची शक्ती खूप कमी पडली…”, अरबाजच्या युक्तीचं आणि खेळाचं पहिल्यांदाच कौतुक; तिसऱ्या पर्वातील सदस्याची पोस्ट चर्चेत

हेही वाचा : Video : “मराठी जनता तुला ओळखत नव्हती, म्हणून…”, जान्हवीचं निक्कीला ओपन चॅलेंज; म्हणाली, “दम असेल तर…”

दरम्यान, आर्याने केलेल्या कृत्याबद्दल तिला ‘बिग बॉस’कडून मोठी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ही शिक्षा नेमकी काय असेल हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. यापूर्वी अशी घटना घडलेली तेव्हा बिग बॉसने संबंधित सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, यावेळी ‘बिग बॉस’कडून काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं आणि विशेषत: आर्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Story img Loader