Bigg Boss Marathi Kedar Shide : ‘बिग बॉस मराठी’च्या तुफान गाजलेल्या पाचव्या पर्वाची ६ ऑक्टोबर रोजी सांगता झाली. सूरज चव्हाणने यंदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर, अभिजीत सावंत पाचव्या सीझनचा उपविजेता ठरला. या दोघांनाही संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळालं. यावर्षीच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना एक मोठा बदल पाहायला मिळाला आणि हा बदल होता होस्टिंगचा… यंदा पहिल्यांदाच रितेश देशमुखने होस्टिंगची धुरा सांभाळली होती आणि यात अभिनेत्याला भरभरून यश मिळालं.

भाऊच्या धक्क्याच्या ( Bigg Boss Marathi ) टीआरपीने यावर्षी उच्चांक गाठला होता. याचं श्रेय घरातील सदस्यांसह रितेश देशमुखचं देखील आहे. याशिवाय परदेशातील शूटिंगमधून ब्रेक घेत रितेश खास ग्रँड फिनालेसाठी मायदेशी परतला होता. त्यामुळे अभिनेत्याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अशातच आता खुद्द ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड आणि लोकप्रिय मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी रितेशसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
bjp leader vinod tawde reply to sharad pawar for targeting amit shah
अमित शहा देशभक्तीच्या प्रकरणात तडीपार; विनोद तावडे यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
ex-servicemen , nation building, Army Chief ,
माजी सैनिकांचा राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभाग शक्य; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे मत
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

हेही वाचा : Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरचं घरी जंगी स्वागत, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, म्हणाले, “एक नंबर निर्णय…”

केदार शिंदेंनी रितेशला मिठी मारत एक खास फोटो शेअर केला आहे. ते लिहितात, “एका शानदार पर्वाची सांगता झाली. रितेश भाऊ तुमचे मनापासून आभार. एका ग्रेट माणसाची या निमित्ताने ओळख झाली, त्यांच्या जवळ जाता आलं. स्वामी कृपा.” नेटकऱ्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पोस्ट, बारामतीचा उल्लेख करत म्हणाले…

Bigg Boss Marathi – सूरज चव्हाणसाठी मोठी घोषणा

याशिवाय ग्रँड फिनालेला ( Bigg Boss Marathi ) केदार शिंदेंनी सूरज चव्हाणसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सूरज चव्हाणवर सिनेमा बनवणार असल्याचं ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेला जाहीर केलं. या सिनेमाचा हिरो सुद्धा सूरजचं असणार आहे. तसेच या सिनेमाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार असल्याचं केदार शिंदे यांनी सांगितलं आहे.

Story img Loader