यंदा बिग बॉसचे चौथे पर्व विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन बिग बॉसचे चौथे पर्व गाजताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात असलेले अभिनेते किरण माने हे चांगलेच चर्चेत आहेत. ते फेसबुकवर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. या आठवड्याचा कॅप्टन म्हणून रोहित शिंदेची वर्णी लागली आहे. त्यानंतर किरण मानेंनी एक पोस्ट शेअर केली.
किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी बिग बॉसच्या कॅप्टन्सी टास्कदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबर त्यांनी याला एक कॅप्शनही दिले आहे. त्यांनी त्याच्या साताऱ्याच्या स्टाइलमध्ये हे लिहिलं आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे.
आणखी वाचा : “टक्कल असलेल्या मॉडेलबरोबर…” कर्करोगाशी झुंज देणाऱ्या अभिनेत्रीची इमोशनल पोस्ट चर्चेत
किरण मानेंची फेसबुक पोस्ट
“पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जातोय का काय? असा वाटलेला ह्यो आपला किरन्या गेली ४० दिस घरात भक्कमपनी उभा हाय… ह्या ४० दिसाच्या प्रवासात काय काय नाय बघितलं आपल्या या वाघानी… सामान्य वाटणाऱ्या ईक्या सारख्या पोरामधली असामान्य ताकद ओळखून त्याचा आवाज बनला ह्यो. मायेची आन मार्गदर्शनाची सावली ईक्या वर आशी धरली की त्यात त्याची स्वतःची सावली हरवू नये. खेळायचं आसाल तर आवाज आन उगा बडबड करायलाच लागती हे समीकरण बी आपल्याच किरन्यानी उलथून लावलं. इरोधकांची किती वादळं आली?, शनवार, रईवार अब्रूची लख्तरं टांगली गेली, पण आपला सातारचा बच्चन मागं सरला न्हाय…! उलट आणखीन पेटून मोठ्या जिद्दीनं त्यांनी लढा दिला.
आन त्याच्या याच लढ्याची आन जिद्दीची साक्ष देणारा कालचा खेळांनी आपल्या साऱ्यांची छाती इचभर आजुन फुगवली! दोन फेऱ्यांमधी ईजय मिळवून रोहित घराचा कॅप्टन झाला. हे माहीत आसून सुद्धा तिसऱ्या फेरीतबी आपला किरन्या वाघासारखा लढला… आपल्या वाघाला कालच्या टास्क मधी साथ देणाऱ्या तेजस्विनी आन अमृता बी एखाद्या वाघिणी सारख्या लढल्या… अक्षय आन ईक्याची जिगरबाज साथीमूळ खेळ खऱ्या अर्थानी रंगला तवा या सगळ्यांचे मनापासुन आभार… स्वतःची हार पचवून, जिंकलेल्याच कौतुक खुल्या मनानं करायाबी लय्य मोठ्ठ काळीज लागतं हे बी आपल्या किरन्यानी समद्या जगाला दावलं… स्वार्थापायी एकमेकांशी कधी गोड, कधी तिखट वागणाऱ्या घरातल्या इतर सदस्यांपेक्षा, आपला कडू किरन्या दहापट उजवा हाय.. व्हय व्हय कडूच, “सत्य” कडूच असतं न्हवं का?”, असे किरण मानेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “देव यांना सदबुद्धी देवो…” स्वत:बद्दल चुकीची बातमी वाचताच कुशल बद्रिके संतापला
दरम्यान बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवल्यापासून सदस्यांमध्ये दोन ग्रुप पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतत कोणाची ना कोणाची तरी भांडण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यामुळे बिग बॉसचा कार्यक्रम दिवसेंदिवस मजेशीर होताना दिसत आहे.