Bigg Boss Marathi Bhau Cha Dhakka : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर दिवसेंदिवस या शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अगदी मराठी कलाकारांमध्ये देखील ‘बिग बॉस मराठी’ची क्रेझ निर्माण झाली आहे. मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सायली संजीवचा असाच एक ‘बिग बॉस मराठी’ पाहतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचं होस्टिंग यंदा रितेश देशमुख करत आहे. अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरुवात बॉलीवूड इंडस्ट्रीत केली होती. त्यामुळे देशभरात रितेश देशमुखचा मोठा चाहतावर्ग आहे. यावर्षी पहिल्यांदाच त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी घेतली आहे. सध्या सीझनला तुफान प्रतिसाद मिळत आहे. यासंदर्भात अभिनेत्री क्रांती रेडकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “निक्की पुराण ऐकायला दीड तास वाया…”, भाऊचा धक्का पाहून नेटकरी नाराज! म्हणाले, “रितेश भाऊ…“
क्रांती रेडकर व सायली संजीवचा व्हिडीओ चर्चेत
क्रांती रेडकर व सायली संजीव या दोन्ही अभिनेत्री नुकत्याच कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यावेळी दोघींनीही चक्क हॉटेलमध्ये बसून, सगळ्या गोष्टी सोडून ‘बिग बॉस मराठी’ पाहण्यास प्राधान्य दिलं. या दोन्ही आघाडीच्या अभिनेत्रींनी भाऊचा धक्का लाइव्ह पाहिला.
क्रांती आणि सायली या व्हिडीओमध्ये सांगतात, “आम्ही सगळं सोडून ‘बिग बॉस मराठी’चा भाऊचा धक्का बघतोय… तो सुद्धा मोबाइलवर लाइव्ह! आणि आमची टीम C आहे. बाईsss हा काय प्रकार” सध्या निक्कीचा ‘बाईsss’ डायलॉग सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. अगदी दहीहंडी उत्सवापासून ते सोशल मीडियावरील रील्समध्ये निक्कीच्या ‘बाईsss’ शब्दाची क्रेझ निर्माण झाली आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video: “तुमचा गेम निक्की शिवाय दिसत नाही”, रितेश देशमुखने केली आर्याची कानउघडणी, म्हणाला, “मला इथे सांगू नका…”
क्रांती रेडकर व सायली संजीवला एकत्र ‘बिग बॉस’मराठी पाहताना पाहून नेटकऱ्यांनी या दोन्ही अभिनेत्रींचं कौतुक केलं आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या आधीच्या पर्वात चावडीवर सदस्यांची शाळा घेतली जायची. परंतु, यावर्षी संपूर्ण गणित बदललं आहे. आता ‘बिग बॉस’च्या सदस्यांची शाळा भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखकडून घेतली जाते. गेल्या महिन्याभरात कार्यक्रमाला खूप चांगला टीआरपी मिळाला आहे.