Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या पर्वात सूरज चव्हाणने बाजी मारत पाचव्या पर्वाच्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सध्या सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. मात्र, अशातच एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता म्हणून सूरज चव्हाणचं नाव घोषित केल्यावर अभिनेत्री मिताली मयेकरने एक पोस्ट शेअर केली होती. कालांतराने अभिनेत्रीने ही पोस्ट डिलिट केली मात्र, सध्या या पोस्टचा संदर्भ नेटकऱ्यांनी सूरज चव्हाणशी जोडला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “शांत, सज्जनतेने वागणारे स्पर्धक उपविजेते…”, सूरजने ट्रॉफी जिंकल्यावर पुष्कर जोगची पोस्ट, अभिजीतबद्दल म्हणाला…

मितालीच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मिताली मयेकरला ओळखलं जातं. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अनेकदा इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ती आपलं स्पष्ट मत मांडत असते. तिने ‘बिग बॉस मराठी’चा विजेता घोषित झाल्यावर शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

मितालीने इन्स्टाग्राम स्टोरीवर “रिअ‍ॅलिटी की Sympathy शो?” असा सवाल उपस्थित करत तोंडावर चैन असलेला इमोजी या पोस्टमध्ये शेअर केला आहे. या पोस्टमधून “रिअ‍ॅलिटी शो आहे की दया दाखवणारा शो” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे मितालीचा रोख सूरजकडे ( Bigg Boss Marathi )असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र, तिने या पोस्टमध्ये कोणाचंही नाव लिहिलेलं नाही.

हेही वाचा : Bigg Boss Marathi“झापुक झुपूक पॅटर्नमध्ये…”, विजयी झाल्यावर सूरज चव्हाणची पहिली प्रतिक्रिया! १४.६ लाखांचं काय करणार? म्हणाला…

मिताली मयेकरची पोस्ट ( Bigg Boss Marathi )

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’बद्दल ( Bigg Boss Marathi ) सांगायचं झालं तर, यंदा १४.६ रुपयांचा धनादेश जिंकून सूरजने या पर्वात बाजी मारली आहे. याशिवाय लोकप्रिय गायक अभिजीत सावंत या पर्वाचा उपविजेता ठरला आहे.