Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये सध्या घरात दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव, इरिना, छोटा पुढारी एका गटात आहेत. तर, वर्षा, अभिजीत, आर्या, अंकिता, धनंजय यांच्यासह घरातील इतर सदस्यांचा वेगळा ग्रुप आहे. पहिल्या आठवड्यापासून दोन्ही गटातील सदस्यांमध्ये जोरदार भांडणं होत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये जान्हवी आणि वर्षा उसगांवकरांमध्ये टोकाचे वाद झाल्याचे पाहायला मिळालं.
जान्हवीने गार्डन परिसरात वर्षा उसगांवकरांबरोबर भांडण करताना त्यांच्या पुरस्कारांबाबत भाष्य केलं. “ही फाल्तूची ओव्हरअॅक्टिंग नका करू… त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत…पण, तुम्हाला दिलाय.” असं वक्तव्य जान्हवीने केल्याने सध्या सोशल मीडियावर तिच्याविरुद्ध टीकेचा भडीमार सुरू आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “ताई ही घाणेरडी अॅक्टिंग…”, जान्हवीकडून वर्षा उसगांवकरांचा अपमान; नेटकरी संतप्त होत म्हणाले, “लाज वाटली पाहिजे…”
मेघा धाडेची संतप्त पोस्ट
‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने या संपूर्ण प्रकणावर संतप्त पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री लिहिते, “माझ्या लाडक्या ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका… तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा. ही माझी कळकळीची विनंती आहे. ‘बिग बॉस मराठी’ची सर्वांत वाईट स्पर्धक…जान्हवी किल्लेकर”
“मला अजूनही आठवतंय की, हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सलमान खान सरांनी प्रियांका जग्गा आणि स्वामी ओम यांना ‘बिग बॉस’च्या घरातून त्यांनी केलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल बाहेर काढलं होतं. आता आम्हाला रितेश देशमुख सरांकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे. तुम्ही याबद्दल नक्की काहीतरी बोला.. काही स्पर्धकांप्रती जान्हवी किल्लेकरचं असं वागणं अत्यंत चुकीचं आहे. रितेश सर, प्लीज तिला बाहेर हाकलून द्या… आम्हाला असे लोक घरात नको आहेत. ही माझी कळकळीची विनंती आहे.” अशी पोस्ट शेअर करत मेघा धाडेने ‘कलर्स मराठी’, ‘बिग बॉस’ आणि रितेश देशमुखला या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “मी तर अनाथ मुलगीच बायको करणार”, घरच्यांच्या आठवणीत सुरज चव्हाणने केलं वक्तव्य
दरम्यान, सध्या जान्हवीने ‘बिग बॉस’च्या घरात केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर नाराजी पसरली आहे. नेटकऱ्यांनी जान्हवीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘कलर्स मराठी’च्या पोस्टवर याबद्दल असंख्य कमेंट्स आल्या आहेत. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख जान्हवीची शाळा घेणार की नाही? यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.