Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासून या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या या पाचव्या पर्वाबद्दल, घरातील सदस्यांबद्दल अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने लक्ष वेधलं आहे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अंकिता खेळाविषयी सूरजला समजवताना दिसत आहे. अनेकदा कोकण हार्टेड गर्ल सूरजला गेम कसा खेळावा, घरात कसं वागावं, नेमका टास्क काय आहे या सगळ्या गोष्टी समजवत असते. ‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आता एका मराठी अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “मिस्टर युनिव्हर्सला धाप लागली…”, संग्रामला टोला, तर अरबाजच्या खेळाचं कौतुक; उत्कर्ष शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष

मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

‘बिग बॉस’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री मीरा जगन्नाथने अंकिता-सूरजचा व्हिडीओ शेअर करत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वत: यापूर्वीच्या पर्वात सहभागी झाल्याने तिला घरातील वातावरण, टास्क, घरात राहण्याची रणनीती याची जाण आहे. अभिनेत्री पोस्ट शेअर करत लिहिते, “हिला जसं खेळायचंय तसं खेळते…आणि दुसऱ्यांना अडवते. असं नको खेळू, तसं नको खेळू…सूरज लढ बापू!”

हेही वाचा : अमिताभ बच्चन-जया यांचे आंतरजातीय लग्न लावण्यास भटजीने दिलेला नकार; बिग बींचे सासरे म्हणाले होते, “लग्नाचे विधी…”

Bigg Boss Marathi : अभिनेत्री मीरा जगन्नाथची पोस्ट

हेही वाचा : कर्करोगाचे निदान झाल्यावरही किरण खेर यांनी केलेलं ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चं चित्रीकरण, म्हणाल्या, “मी तो शो सोडू शकत नव्हते, कारण….”

मीराने यापूर्वी निक्कीच्या खेळाविषयी देखील पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं होतं. सध्या मालिका, विविध टीव्ही शोजमध्ये ती काम करत आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाबद्दल सांगायचं झालं तर, या आठवड्यात घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी एकूण ५ सदस्य नॉमिनेट आहेत. अरबाज, निक्की, सूरज, जान्हवी आणि वर्षा या पाच सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. आता यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार हे येत्या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi mira jagannath slams ankita walawalkar shares post sva 00