Bigg Boss Marathi Pandharinath Kamble : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. दरवर्षी हा शो १०० दिवसांनी प्रेक्षकांचा निरोप घेतो. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच हा शो ७० दिवसांनी संपणार आहे. ‘बिग बॉस’ने यासंदर्भात अधिकृत घोषणा करत घरातील सर्व सदस्यांना ६ ऑक्टोबरला ग्रँड फिनाले पार पडणार असल्याची माहिती दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क पार पडला नव्हता. याउलट ‘बिग बॉस’ने घरात असणाऱ्या सगळ्या ८ सदस्यांना थेट नॉमिनेट केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे आणि वर्षा उसगांवकर हे घरातील आठ सदस्य या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. यांच्यापैकी कोण घराचा निरोप घेणार याबद्दल गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. अशातच आता पंढरीनाथ कांबळेचा प्रवास ‘बिग बॉस’च्या घरातून संपला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss मध्ये गैरहजर राहणाऱ्या रितेश देशमुखचा परदेशातील व्हिडीओ आला समोर! जिनिलीया म्हणते, “बाबाला २० दिवसांनी…

पंढरीनाथच्या एलिमिनेशनची सोशल मीडियावर चर्चा

पॅडी कांबळे घरातून एलिमिनेट झाल्याच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स सेक्शनमध्ये पॅडीच्या एलिमिनेशनवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना पॅडी कांबळे एलिमिनेट झाल्याचं ऐकून मोठा धक्का बसला आहे. पंढरीनाथने पहिल्या दिवसापासून स्वत:चा खेळ सांभाळून सूरजला प्रत्येक अडचणीत खंबीरपणे साथ दिली. पॅडीचा सर्वांना मदत करण्याचा स्वभाव प्रत्येकाला भावला होता. त्यामुळेच महाराष्ट्राभरातून याशिवाय मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील पॅडीला पूर्णपणे पाठिंबा देत भरभरून मतं देण्याची विनंती प्रेक्षकांना केली होती. मात्र, सध्या सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चर्चांनुसार तो ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्याचं समोर येत आहे. यावर अद्याप वाहिनीकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही.

Bigg Boss Marathi : पंढरीनाथ घराबाहेर झाल्याची सोशल मीडियावर चर्चा

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “त्या सीझनमध्ये एकाही मुलाला सोडलं नाहीस”, राखी सावंतने केली निक्कीची बोलती बंद; म्हणाली, “आय लव्ह यू बोलून…”

हेही वाचा : शेवटच्या आठवड्यात Bigg Boss Marathi ची वेळ बदलणार! नव्या मालिकेसाठी घेतला मोठा निर्णय; फक्त ३ दिवसांसाठी

पॅडी कांबळे एलिमिनेट झाल्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. “अनफेअर…वर्षा मॅम जायला पाहिजे”, “निक्की आणि वर्षा जायला पाहिजेत”, “सूरज भाऊंचा खंबीर आधार”, “खरं वाटत नाहीये”, “हे कसं शक्य आहे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर करत अनेकांनी पॅडीच्या एव्हिक्शनबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता सोशल मीडियावर सुरू असलेली ही चर्चा खरी ठरणार की, दुसराच कोणता सदस्य घराचा निरोप घेणार हे अधिकृतरित्या आजच्या ( २९ सप्टेंबर ) एपिसोडमधून स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi netizens predict pandharinath kamble eliminated from bb house post viral on social media sva 00
Show comments