Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. येत्या ६ ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता घरात बाकी राहिलेल्या ८ स्पर्धकांमध्ये अतितटीची लढाई सुरू आहे. सध्या घरात लगोरीचा खेळ सुरू आहे. यासाठी संपूर्ण घर दोन टीममध्ये विभागण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरात दोन टीम करण्यात आल्या आहेत. एका टीममध्ये अंकिता, जान्हवी, अभिजीत आणि पंढरीनाथ हे सदस्य आहेत. तर, दुसऱ्या टीममध्ये धनंजय, निक्की, वर्षा आणि सूरज हे चार जण आहेत. यांच्यापैकी जी टीम लगोरीच्या खेळात विजयी ठरेल त्या टीमचे चार सदस्य घरात मालक होतील आणि जी टीम हरेल त्या टीमच्या सदस्यांना मालकांनी सांगितलेली सगळी कामं सांगकाम्याप्रमाणे ऐकावी लागणार आहेत.

हेही वाचा : Video : लगोरीचा खेळ जान्हवीला पडणार भारी! टास्कदरम्यान झाली दुखापत, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

लगोरीचा टास्क कोणाला पडणार भारी?

लगोरीच्या टीममध्ये मंगळवारच्या भागात अंकिता विरुद्ध निक्की आणि पॅडी विरुद्ध डीपी अशी लढत झाली. दोन्ही डावांमध्ये निकाल लागला नाही आणि यामुळेच दोन्ही टीमला शून्य गुण मिळाले. आता आजच्या भागात जान्हवी विरुद्ध सूरज आणि वर्षा उसगांवकर यांच्या विरुद्ध अंकिता असा टास्क खेळण्यासाठी येईल.

वर्षा यांना या लगोरीच्या टास्कमध्ये अंकिताप्रमाणे ताकद लावायला आली नसती त्यामुळे स्ट्रॅटेजीचा वापर करून त्या टास्क सुरू झाल्यावर लगेच अंकिताच्या लगोरीला पकडून बसल्या. यामुळे तिची मोठी कोंडी झाली. तिला स्वत:च्या लगोरीमध्ये एकही ठोकळा टाकता येत नव्हता. यावेळी लगोरी अडवून बसलेल्या वर्षा यांना अंकिताने खाली खेचलं. दोघींमध्ये या टास्कमध्ये चांगलीच खेचाखेची झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अंकिता वर्षा यांना खेचतेय हे पाहून निक्कीने लगेच अंकिताला टोला लगावला. “वर्षा ताई घोरपडीसारख्या चिकटून राहा…तुम्ही स्ट्राँग आहात. हा कुस्तीचा खेळ नाहीये, किती घाणेरडा गेम खेळतात” याशिवाय नेटकऱ्यांनी देखील अंकिताच्या खेळीवर नाराजी व्यक्त केली आहे. “त्यांच्या वयाचा तरी विचार कर अंकिता”, “आता कुठे गेली संस्कृती”, “अंकिताला बाहेर काढा” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “एकीकडे म्हणते सूरजला घर बांधून देणार अन् दुसरीकडे…”, अंकिताच्या ‘त्या’ कृतीवर घन:श्याम नाराज; म्हणाला…

Bigg Boss Marathi : नेटकरी अंकितावर नाराज

दरम्यान, अंकिताने वर्षा यांना खेचल्यामुळे तिच्यावर काही नेटकरी नाराज झाले असले तरी, आता गेमच्या ( Bigg Boss Marathi ) दृष्टीकोनातून अंकिता बरोबर खेळतेय असंही मत अनेकांना मांडलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi netizens slams ankita walawalkar for pushing varsha in the task sva 00