Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. निक्की – अरबाजमध्ये भाऊच्या धक्क्यानंतर मोठं भांडण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या भांडणात अरबाजने घरात देखील तोडफोड केली होती. याची शिक्षा म्हणून ‘बिग बॉस’ने त्याच्याकडून कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेतली आहे. याशिवाय अरबाजने निक्कीशी बोलू नये यासाठी संपूर्ण घर त्याची पाठराखण करत असल्याचं पाहायला मिळालं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘बिग बॉस’ने या आठवड्यात सगळ्या सदस्यांना जोड्यांनी खेळण्याचा टास्क दिला आहे. अभिजीत-निक्की, आर्या-अरबाज, सूरज-जान्हवी अशा जोड्या घरात बनवण्यात आल्या. अरबाज व निक्कीमध्ये झालेल्या वैयक्तिक भांडणात अभिजीत सोडून संपूर्ण घराने उडी घेतली होती. अभिजीतने शेवटपर्यंत निक्की-अरबाजच्या वैयक्तिक भांडणांकडे दुर्लक्ष केलं. ‘पाताळ लोक’ टास्कनंतर देखील अभिजीतने निक्कीला तिच्या चुका स्पष्टपणे समजावून सांगितल्या. यावेळी पहिल्यांदाच अरबाज स्वत:हून अभिजीतला येऊन “आजपासून तुम्हाला मी दादा हाक मारणार” असं म्हणाला. यानंतर अभिजीतने निक्कीला अरबाजशी बोलण्यासाठी बोलावलं.
हेही वाचा : पाय खेचून लोळवलं, बॉक्स फोडले अन्…; टास्कमध्ये अंकिता-घन:श्याममध्ये मोठी झटापट! अखेर कोणी मारली बाजी?
अरबाज-निक्कीचा असा असेल गेमप्लॅन
निक्की-अरबाज ( Bigg Boss Marathi ) एकमेकांशी पुन्हा बोलू लागले ही गोष्ट वैभव आणि जान्हवीला प्रचंड खटकली. यावर निक्कीने अरबाजला, “तुझ्या बहिणीला तू माझ्याशी बोलतो हे आवडत नाही” असा टोमणा देखील मारला. यानंतर घरातले सगळे सदस्य झोपल्यावर अरबाजने निक्कीची माफी मागितली. यावर निक्की “आपल्याला पुन्हा घरात सर्वांसमोर असं वागता येणार नाही. कारण, तू माझ्याशी बोललास तर तुझ्या मित्रांना ते आवडत नाही आणि मला आता वैभव-जान्हवी पटत नाहीत.” यानंतर अरबाज आणि निक्की घरात एकमेकांशी न भांडता नीट बोलायचं, मैत्री ठेवायची आणि पुढे गेम खेळायचा असं ठरवतात.
घरात सगळे झोपल्यावर अरबाज नियम मोडून कॅप्टन रुममध्ये जातो आणि बेडवर बसतो असं देखील आजच्या ( ३० ऑगस्ट ) एपिसोडमध्ये पाहायला मिळालं. आता अरबाज-निक्कीचं भांडण मिटल्याचं घरातल्यांना समजणार की नाही? दोघे सर्वांसमोर नेमकं कसं वागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. परंतु, या सगळ्या ड्रामावर नेटकऱ्यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अरबाज-निक्कीचा भांडण मिटल्याचा रोमँटिक व्हिडीओ पाहून “बाकीच्या लोकांसाठी २ मिनिटं शांतता खास करून वैभव आणि जान्हवीसाठी”, “बिग बॉस नाही रोडिज Splitsvilla बघतोय असं वाटतंय”, “टीम B ला यांनी मस्त मूर्ख बनवलंय”, “एक नंबर खेळ केला निकी अरबाजने”, “b टीम मूर्ख बनली सगळी” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत. आता रितेश देशमुख यावर भाऊच्या धक्क्यावर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.