Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. यावेळी रितेश देशमुखने अरबाजसह B टीमची चांगलीच शाळा घेतली. गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना अरबाजचं रौद्ररुप पाहायला मिळालं होतं. निक्कीशी भांडण करून त्याने घरातील सामानाची तोडफोड केली होती. यानंतर अरबाजला ‘बिग बॉस’ने शिक्षा देखील केली होती. कॅप्टन्सीच्या उमेदवारीतून त्याला बाद करण्यात आलं होतं.

घरात झालेल्या भांडणांमध्ये अरबाजची सर्वांनी बाजू घेतली. संपूर्ण घरात निक्की-अभिजीत विरुद्ध उर्वरित १० सदस्य असा गोंधळ पाहायला मिळाला होता. याशिवाय अभिजीत-निक्कीच्या निखळ मैत्रीबाबत सुद्धा अरबाजने संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या चुकीच्या वागणुकीबद्दल त्याला भाऊच्या धक्क्यावर जाब विचारण्यात आला. एवढंच नव्हे तर आर्याची सुद्धा शाळा घेण्यात आली.

Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
Lakhat EK Aamcha Dada
‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ स्पर्धेत डॅडी आणि सूर्या समोरासमोर येणार, ‘लाखात एक आमचा दादा’मधील डॅडी म्हणाले, “निंबाळकर घराण्याच्या इज्जतीचा…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Marathi actor saurabh gokhale
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर…”; मराठी अभिनेता पोस्ट करत म्हणाला, “बेताल, बेलगाम…”
Abhishek Bachchan
“आराध्याकडून कोणत्या अपेक्षा…”, अभिषेक बच्चन पालकत्वावर बोलताना म्हणाला, “फक्त आई-वडिलांनी…”
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra Talk About Sidharth Shukla
“मनाने खूप मोठा माणूस…”, सिद्धार्थ शुक्लाशी तुलना करण्यावरून करणवीर मेहराचं वक्तव्य; जुनी आठवण सांगत म्हणाला, “त्याची महागडी बाईक…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video: “तुम्हाला झालेला त्रास खोटा अन्…”, रितेश देशमुखने घेतली अरबाजची शाळा, चक्रव्यूह रूम उघडून केली पोलखोल

रितेशने इतर सगळ्या सदस्यांना झापून निक्कीची बाजू घेतल्याने प्रेक्षकांना भाऊच्या धक्क्यावर नाराजी व्यक्त केली आहे. निक्की आतापर्यंत अत्यंत चुकीची खेळत होती. त्यामुळे तिचं एवढं कौतुक करण्याची काहीच गरज नव्हती असा दावा असंख्य नेटकऱ्यांनी केला आहे. ‘कलर्स मराठी वाहिनी’ने ‘बिग बॉस’ मराठी संदर्भात शेअर केलेल्या प्रत्येक पोस्ट नेटकरी कमेंट्स करत आहेत.

“निक्की पुराण ऐकायला आम्ही दीड तास वाया घालवला”, “निक्कीला देव बनवायची गरज नाही”, “बिग बॉसमध्ये बिग बॉस दाखवा निक्की शो दाखवू नका”, “आजचा भाऊचा धक्का एकदम बोअरिंग उद्यापासून बिग बॉस बघणं बंद”, “आज रितेश सर निक्कीच्या बिग बॉसचं hosting करत होते” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर करत नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video: “तुमचा गेम निक्की शिवाय दिसत नाही”, रितेश देशमुखने केली आर्याची कानउघडणी, म्हणाला, “मला इथे सांगू नका…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi – नेटकऱ्यांच्या कमेंट्स
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi – नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, गेल्या आठवड्यात निक्की, अभिजीत, वर्षा आणि अंकिता हे चार सदस्य नॉमिनेट झाले होते. परंतु, या चौघांपैकी कोणीही घराबाहेर जाणार नाही. यामागचं कारण म्हणजे, ‘बिग बॉस’कडून व्होटिंग लाइन्स बंद ठेवण्यात आल्या होत्या. याबाबत घरातल्या सदस्यांना कल्पना नाही. त्यामुळे रितेश आता घरच्यांची कशी फिरकी घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Story img Loader