Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा सहावा आठवडा आजपासून सुरू होणार आहे. घरात आता एकूण १२ स्पर्धक उरले आहेत. योगिता, निखिल, पुरुषोत्तम आणि इरिना यांच्या एक्झिटनंतर घरातील उर्वरित सदस्यांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एवढे दिवस अप्रत्यक्ष नॉमिनेशन व्हायचं. टास्क, जोड्या, पॉवर कार्ड किंवा गुहेत गुप्त नॉमिनेशन झाल्याचं आपण पाहिलं आहे. परंतु, या सहाव्या आठवड्यात पहिल्यांदाच घरातील सदस्य एकमेकांना थेट समोरासमोर नॉमिनेट करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’ने घरातील एकूण १२ सदस्यांचे फोटो टेबलवर ठेवले आहेत. याच्या बरोबर बाजूला हिरव्या रंगाची कचरापेटी ठेवण्यात आली आहे. घरात असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या आणि नको असलेल्या सदस्यांचे फोटो फाडून कचरा पेटीत टाकण्याचा नॉमिनेशन टास्क घरातील सदस्यांना देण्यात आला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरला भाऊच्या धक्क्यावर नो एन्ट्री! शिक्षेची आठवण करून देत रितेश देशमुख म्हणाला…

‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर याचा प्रोमो शेअर करत याला “घरात ज्याचा खेळ नाही दमदार, तो सरळ बनणार रद्दीचा भार” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या टास्कदरम्यान सदस्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अनेकांनी गद्दारी केली, घरात स्वत:चं मत नाही, गेम खेळता येत नाही अशी कारणं देत विरोधी स्पर्धकांना नॉमिनेट केलं आहे. आता या थेट नॉमिनेशन प्रक्रियेत कोण-कोणाला नॉमिनेट करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

घरात यापूर्वी ‘टीम A’ व ‘टीम B’ असे दोन ग्रुप होते. परंतु, निक्कीला भाऊच्या धक्क्यावर तिच्या मित्रमंडळींनी केलेल्या चुगल्या दाखवल्यामुळे ‘A टीम’मध्ये उभी फूट पडली आहे. आता निक्कीची फक्त अरबाजबरोबर मैत्री असून जान्हवी अन् वैभवबरोबर असणारी मैत्री तुटली आहे. त्यामुळे निक्की आता कोणाला नॉमिनेट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Bigg Boss Marathiच्या घरात नवीन नॉमिनेशन टास्क

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5: निक्कीमुळे अरबाज पटेलचं ब्रेकअप? गर्लफ्रेंडने नाव घेत केली पोस्ट; म्हणाली, “मला त्याच्याबद्दल…”

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणारं हे नॉमिनेशन कार्य पाहून नेटकऱ्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये नेहमीप्रमाणे ‘टीम B’ला सपोर्ट केला आहे. आता ‘टीम B’ या टास्कमध्ये एकत्र खेळणार की त्यांच्याही ग्रुपमध्ये फूट पडणार हे लवकरच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi new nomination task of 6th week here is the twist sva 00