Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क खेळण्यात आला. या टास्कमध्ये दोन्ही टीममध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. टीम ‘बी’ने घरात पहिल्यांदाच डोकं लावून या टास्कमध्ये खेळी खेळली. परिणामी दोन्ही टीम्स बीबी करन्सी जिंकू शकल्या नाहीत. सदस्यांना याचे परिणाम भोगावे लागणार असा सूचक इशारा ‘बिग बॉस’ने हा टास्क संपताना सर्वांना दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबाज काय निवडणार?

“आजची रात्री शांत झोपून घ्या कारण, उद्याचा दिवस सोपा नसेल” असं ‘बिग बॉस’ने सांगितलं आणि ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कचा शेवट झाला. याचे परिणाम असे झालेत की, अरबाजला आपली कॅप्टनसी गमवावी लागण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस’ अरबाजसमोर पर्याय ठेवतात. दोन्ही टिम सुख-सुविधांचा लाभ घेऊ शकतात पण, या बदल्यात तुम्हाला तुमची कॅप्टनसी गमवावी लागेल. आता अरबाज कॅप्टनसी निवडणार की दोन्ही टीमचा विचार करणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “हे काम तुम्हाला बाप जन्मात…”, जान्हवीकडून पंढरीनाथचा अपमान! विशाखा सुभेदार संतापून म्हणाली, “शांत आहे याचा अर्थ…”

‘बिग बॉस’ने ट्विस्ट सांगितल्यावर ‘ए’ टीम म्हणजेच निक्की, जान्हवी व वैभव यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. अरबाजने कॅप्टन्सीवर पाणी सोडल्यास विरुद्ध टीमला याचा काहीच न करता फायदा होणार आहे. आता याला निक्कीची ‘ए’ टीम कशी मान्यता देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi : अरबाज कॅप्टनपद की बीबी करन्सी काय निवडणार? ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi- “ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले…”, जान्हवीने पुन्हा ओलांडली पातळी! करिअरवर बोट ठेवत पॅडीचा अभिनयावरून केला अपमान

हेही वाचा : “रितेश भाऊ जरा आवाज वाढवा…”, जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यामुळे भडकल्या सुरेखा कुडची, म्हणाल्या, “मांजरेकर असते तर…”

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मस्ती उतरणार लवकरच निक्की आणि जानव्हची पण मस्ती उतरली पाहिजे बिग बॉस”, “अरे ये क्या हो गया…”, “गर्वाचं घर खाली होणं याला म्हणतात”, “Bigg Boss चा कसला भारी ट्विस्ट आहे”, “निक्की आता म्हण बाईईई…”, “आता यासाठी तो मुद्दाम पद सोडेल लोकांची Sympathy Gain करायला” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi new twist arbaz have to give up on captaincy for bb currency watch new promo sva 00