Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्यात घरात मानकाप्याची एन्ट्री झाली होती. त्यामुळे ‘बिग बॉस’ने दिलेल्या नियमानुसार प्रत्येकाला घरात जोडीने राहणं बंधनकारक होतं. अरबाज-आर्या, पॅडी-घन:श्याम अशा जोड्या ‘बिग बॉस’कडून बनवण्यात आल्या होत्या. यावेळी घरात नॉमिनेशन कार्य सुद्धा जोडीनेच पार पडलं होतं. घरातील अन्य सदस्यांनी मिळून निक्की – अभिजीत आणि वर्षा – अंकिता यांच्या दोन जोड्यांना नॉमिनेट केलं. परिणामी, या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर हे चार सदस्य नॉमिनेट झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॉमिनेशन कार्य पार पडल्यावर ‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) सर्व सदस्यांना नॉमिनेट झालेल्या चार सदस्यांची नावं सांगितली. पण, या आठवड्यात व्होटिंग लाइन्स बंद ठेवण्यात आल्या होत्या. व्होटिंग बंद ठेवल्याने स्पर्धकांचे चाहते निर्धास्त होते. दरवेळी ज्या सदस्याला कमी मतं मिळतात तो सदस्य घराचा निरोप घेतो. परंतु, यंदा व्होटिंग बंद असल्याने कोणीही घराबाहेर जाणार नाही असा समज प्रेक्षकांचा होता. मात्र, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ऐनवेळी एक मोठा ट्विस्ट आला आहे. याचा प्रोमो नुकताच ‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : बाईSSS हा काय प्रकार! मराठी अभिनेत्रींमध्ये ‘बिग बॉस’ची क्रेझ; चक्क हॉटेलमध्ये पाहिला भाऊचा धक्का, म्हणाल्या…

अंकिताचा ‘बिग बॉस मराठी’मधील प्रवास संपणार का?

‘बिग बॉस मराठी’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख “अंकिता तुमचा प्रवास आज इथेच संपलाय” असं सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंकिता घराबाहेर होणार असल्याचं रितेशने जाहीर केल्यावर डीपी, सूरज चव्हाण यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर होतात. अंकिताच्या बाहेर जाण्याने टीम B वीक पडेल याची जाणीव तिच्या मित्रमंडळींना असते. त्यामुळे अंकिताच्या एविक्शनबद्दल ऐकून सर्वांनाच धक्का बसतो.

‘बिग बॉस’ने माहिती दिल्याप्रमाणे अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन मुख्य प्रवेशद्वाराकडे येते. मुख्य द्वाराकडे सर्वांना शेवटचं गूडबाय म्हणत अंकिता घरची वाट धरणार असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांसह अंकिताच्या चाहत्यांना याचा खूप मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : “निक्की पुराण ऐकायला दीड तास वाया…”, भाऊचा धक्का पाहून नेटकरी नाराज! म्हणाले, “रितेश भाऊ…”

Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“पण या आठवड्यात वोटिंग बंद होते ना?”, “मग कशी बाहेर गेली?”, “हे कसं शक्य आहे?”, “असं व्हायला नाही पाहिजे”, “तिला बहुधा सिक्रेट रुममध्ये पाठवणार”, “अंकिताला सिक्रेट रुममध्ये ठेवणार… बाहेर काढणं शक्य नाही.” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या या नव्या प्रोमोवर केल्या आहेत. दरम्यान, आता प्रोमोत दाखवल्याप्रमाणे खरंच अंकिता घराबाहेर जाणार की, रितेश एक नवा ट्विस्ट आणणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi new twist riteish deshmukh announced ankita walawalkar eviction team b become emotion sva 00