Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा आठवडा नुकताच सुरु झाला आहे. या आठवड्यात बीबी करन्सीसाठी घरातील सदस्यांना ‘BB फार्म’ हा टास्क देण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही टीमला नळावर दूध जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, यंदा ‘बिग बॉस’कडून काहीशा वेगळ्या टीम विभागण्यात आल्या आहेत. एका टीममध्ये निक्की, धनंजय, अरबाज, पॅडी, घन:श्याम हे सदस्य आहेत यांचा संचालक अभिजीत आहे. तर, वर्षा संचालक असलेल्या दुसऱ्या टीममध्ये आर्या, अंकिता, सूरज, जान्हवी आणि वैभव हे सदस्य आहेत.

‘BB फार्म’ ( Bigg Boss Marathi ) टास्कला सोमवारच्या ( ३ सप्टेंबर ) भागात सुरुवात झाली. मात्र, घरातील काही सदस्यांनी या टास्कमध्ये ज्या नळातून दूध येणार तोच पूर्णवेळ धरून ठेवला होता. यामुळे ‘बिग बॉस’च्या प्रॉपर्टीला नुकसान झालं असतं. दोन्ही टीम काहीच ऐकायला तयार नसल्याने ‘बिग बॉस’कडून एक मोठी शिक्षा देण्यात आली. टास्कमध्ये बळाचा वापर करू नका असं संचालक वर्षा वारंवार सांगत होत्या परंतु, त्यांचं ऐकून घेण्यास कोणीही तयार नव्हतं. शेवटी, ‘बिग बॉस’ने दोन्ही टीममधील एका सदस्याला प्रतिस्पर्धी टीमने बाद करायचं आहे असे आदेश दिले.

aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
big boss marathi these contestants nominated in this week
Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?
bigg boss marathi these seven contestants are nominated
Bigg Boss Marathi : घरातील एकूण ७ सदस्य झाले नॉमिनेट! ‘त्या’ निर्णयामुळे नेटकरी वर्षा-अंकितावर नाराज, नेमकं काय घडलं?
Arbaz Patel Girlfriend leeza bindra breakup post
Bigg Boss Marathi 5: निक्कीमुळे अरबाज पटेलचं ब्रेकअप? गर्लफ्रेंडने नाव घेत केली पोस्ट; म्हणाली, “मला त्याच्याबद्दल…”
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
Bigg Boss Marathi Aarya Slaps Nikki
आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली वाजवली! दोघींमध्ये जोरदार वाद; ‘बिग बॉस’ देणार शिक्षा; म्हणाले, “हे अतिशय निंदनीय…”
bigg boss marathi suraj chavan is the new captain of the house
Video : ‘झापुक झुपूक’ म्हणत सूरज चव्हाण झाला घराचा नवीन कॅप्टन! निक्कीने मारली मिठी, रुमच्या पाया पडला अन्…; पाहा प्रोमो

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “माझा बाप बनू नका…”, निक्कीने वर्षा उसगांवकरांवर पुन्हा आवाज चढवला; नेटकरी म्हणाले, “हिला आवरा बिग बॉस…”

‘बिग बॉस’कडून ( Bigg Boss Marathi ) आदेश आल्यानंतर निक्कीची बोलती चांगलीच बंद झाली. विरुद्ध टीम अरबाजला बाद करण्याची पुरेपूर शक्यता आहे असं तिच्या लक्षात आलं. त्यामुळे सर्वांशी भांडणारी निक्की अगदी सौम्य भाषेत वैभवला “तुझ्या टीमला समजाव” असं सांगत होती. आता दोन्ही टीममधून बाद होणारा प्रत्येकी एक सदस्य कोणता असेल हे आजच्या भागात स्पष्ट होईल. परंतु, एकंदर या ‘बीबी फार्म’ टास्कमध्ये जोरदार राडा होणार असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून लक्षात येत आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : अरबाज – आर्यामध्ये वाद ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

निक्की – आर्यामध्ये जुंपली

“ए म्हशे तुला त्रास होता…म्हशे गप्प बस” असं निक्की आर्याला म्हणत असल्याचं या प्रोमोमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. यानंतर आर्याने देखील माघार न घेता “तू म्हशी…” असं तिला थेट उत्तर दिलं. आर्या अन् निक्कीचं एकमेकांशी अजिबातच पटत नाही. त्यामुळे या ‘BB फार्म’ टास्कमध्ये देखील दोघींमध्ये टोकाचे वाद होणार आहेत. याशिवाय जान्हवी सुद्धा या टास्कमध्ये जोरदार खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता या टास्कमध्ये कोणती टीम बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

हेही वाचा : बाप-लेकाचं प्रेम! प्रसाद ओकला मुलाने गिफ्ट दिली आलिशान BMW कार; मंजिरी म्हणाली, “आज २२ वर्षांनी तू बाबाला…”

नेटकऱ्यांनी या प्रोमोमध्ये निक्कीची भाषा ऐकून तिची खिल्ली उडवली आहे. तर, अभिनेता पुष्कर जोगने हा प्रोमो पाहून “छान … जीवच घ्या एकमेकांचा … शक्ती प्रदर्शन” असं म्हटलं आहे. घरातला हा राडा आणि मी कोणतंही काम करणार नाही अशी निक्कीने घेतलेली भूमिका यावर आता रितेश देशमुख काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.