Bigg Boss Marathi Nikki Tamboli And Aarya : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी आणि आर्या जाधव या दोघींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या घरात नवीन कॅप्टन निवडण्यासाठी टास्क सुरू आहे. या टास्कमध्ये निक्की ‘टीम ए’मध्ये तर, आर्या ‘बी टीम’मधून खेळत आहे. विरुद्ध संघांमध्ये खेळत असल्याने या दोघींमध्ये पुन्हा एकदा वाद झाले आहेत. मात्र, यावेळी या दोघींमधले वाद टोकाला गेल्याचं नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोद्वारे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’कडून कॅप्टन निवडण्यासाठी घरातील सदस्यांना एक नवीन टास्क दिला गेला आहे. या टास्कमध्ये अंकिता, वर्षा आर्या, निक्की आणि जान्हवी घराच्या वॉशरुममध्ये टास्कनुसार दिलेल्या स्टोनचं ( मौल्यवान दगड ) संरक्षण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, निक्कीच्या हातात हा स्टोन यावा अशी कोणाचीही इच्छा नसते. यामुळेच आर्या तिचे हात धरत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. यानंतर दोघींमध्ये झटापट होते. “मला धरायचं नाहीये, तुला स्टोनला उचलायचंय” असं निक्की आर्याला रागात सांगते. पण, शेवटी दोघीही एकमेकींचं ऐकून घेण्यास तयार नसतात.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : जान्हवीला मित्रांकडून मिळाला धोका! निक्की ठरली कारण; वैभव-अरबाजला थेट म्हणाली, “यापुढे मी तुमच्या…”

Bigg Boss Marathi- निक्कीने आर्यावर केले आरोप

निक्की शेवटी रडत-रडत वॉशरुम एरियाच्या बाहेर येऊन “बिग बॉस… हिने मला मारलंय आणि मी हे सहन करून घेणार नाही” असं जोरजोरात आरडाओरडा करत आणि रडत सर्वांना सांगत असते. एकीकडे निक्कीचा गोंधळ सुरू असताना आर्या अंकिताला “मला या गोष्टीचा काहीच फरक पडलेला नाहीये. होऊ दे काय ते…गेली तर गेली घरी” असं म्हणते.

निक्की तांबोळी रडत बाहेर गार्डन परिसरात निघून येते. तिच्या मागमोग अरबाज सुद्धा येतो. बाहेर बसून निक्की, “बिग बॉस…एकतर हिला घराच्या बाहेर काढा प्लीज… नाहीतर मला काढा” अशी थेट मागणी ‘बिग बॉस’कडे करते.

Bigg Boss Marathi ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : टास्कमध्ये धक्काबुक्की, जोरदार राडा…; अरबाजचं ‘ते’ रुप पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “संग्राम भाऊ…”

दरम्यान, आता या प्रकरणावर टास्कचा संचालक आणि ‘बिग बॉस’ काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख या दोघींना काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi nikki accusation on aarya huge fight in the captaincy task watch promo sva 00