Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळीचे इतर सदस्यांशी वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. टीम ‘बी’सह कितीही वाद झाले तरीही एवढे दिवस निक्कीचं अरबाज, जान्हवी, वैभव, घन:श्याम यांच्याबरोबर चांगलं बॉण्डिंग झाल्याचं पाहायला मिळतंय. निक्कीने अरबाज-जान्हवीला खूप चांगले मित्र तर, घन:श्यामला भाऊ मानलं आहे. परंतु, ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी या भावा-बहिणीच्या नात्यात फूट पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चौथ्या आठवड्याची सुरुवात निक्की आणि घन:श्यामच्या भांडणाने होणार आहे. खरंतर या भावा-बहिणीचं बॉण्डिंग सर्वात चांगलं होतं त्यामुळे या दोघांमध्ये अचानक काय घडलं याबाबत प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झाली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये निक्की व घन:श्याम एकमेकांशी वाद घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi मध्ये डबल एविक्शन! योगिता अन् निखिल घराबाहेर; जाताना ‘या’ दोन सदस्यांना केलं नॉमिनी, जाणून घ्या…

निक्की व छोटा पुढारी घन:श्याममध्ये टोकाचे वाद

निक्की घन:श्यामला म्हणते, “तू फेक आहेस” यावर छोटा पुढारी रागात तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, “काय फेक वागलो सांग ना तू मला? खरंतर तू किती होपलेस आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय. अगं तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला, जा नाही देत”

Bigg Boss Marathi ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

निक्की यानंतर चिडून घन:श्यामला म्हणते, “झुठा भाऊ भावा – बहिणीच्या नात्यावर धब्बा आहेस तू…” पुढे घन:श्याम तिला म्हणतो, “निक्कू ताई म्हणत होतो मी तुला आणि यामुळेच घात झाला.” दोघांमधले हे टोकाचे वाद पाहून नेटकरी सुद्धा आश्चर्यचकीत झाले आहेत.

हेही वाचा : Video : ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार संदीप खरेंची मुलगी, खास पोस्ट करत म्हणाले, “लाडक्या लेकीची दुसरी मालिका…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi मध्ये मोठा ट्विस्ट! घरात उघडणार नवीन खोली; नाव आहे खूपच खास, पाहा प्रोमो

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’बद्दल सांगायचं झालं, तर नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर डबल एविक्शन झाल्याचं पाहायला मिळालं. योगिता चव्हाण आणि निखिल दामले यांनी घराचा निरोप घेतला. दोघेही एकत्र घराबाहेर जाणं हा घरातील सदस्यांसाठी मोठा धक्का होता. याशिवाय घरात चक्रव्यूह खोली उघडण्यात आली आहे. यामध्ये वीकेंडला घरात कोण आपल्याबद्दल काय गॉसिप करतं याच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या. आता घन:श्याम आणि निक्कीच्या मैत्रीत फूट कोणामुळे पडली हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.