Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की आणि अरबाज एकत्र गेम खेळत आहेत. मात्र, घरात निक्कीची अभिजीतशी देखील चांगली मैत्री आहे. त्या दोघांची मैत्री खटकत असल्याचं अरबाजने अनेकवेळा मान्य केलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून निक्की-अभिजीत एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र, घरात नुकत्याच पार पडलेल्या प्राणी ओळखण्याच्या टास्कमध्ये ‘बिग बॉस’ने निक्की-अभिजीतच्या जोडीची निवड केली होती. यावेळी दोघांनी चांगलं परफॉर्म करत एकूण ३० हजार रुपये बीबी करन्सी मिळवली. या टास्कनंतर निक्कीने घडलेल्या गोष्टींबाबत अभिजीतशी चर्चा करत आपल्या जुन्या मित्राची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घरात यानंतर कॅप्टन्सी कार्याला सुरुवात झाली आहे. यासाठी ‘बिग बॉस’ने एकूण दोन टीम्स केल्या आहेत. ‘टीम ए’मध्ये निक्की, अरबाज, धनंजय, सूरज आणि वर्षा हे सदस्य आहेत. तर ‘टीम बी’मध्ये अभिजीत, अंकिता, जान्हवी, संग्राम आणि पॅडी हे पाच जण आहेत. या दोन्ही ग्रुपला विरोधी टीममधील दोन-दोन स्पर्धकांना प्रत्येक फेरीत बाद करायचे आहेत. टास्क सुरू होण्यापूर्वी अरबाजने संग्राम-जान्हवीशी आधीच डील केली होती. यामुळे पहिल्या फेरीत ‘ए टीम’ला विजय मिळवणं अगदी सहज शक्य झालं. ठरल्याप्रमाणे निक्कीला, अंकिता आणि अभिजीतच्या घरट्यात अंडी टाकून त्यांना कॅप्टन्सी कार्यातून बाद करायचं होतं. पण, ऐनवेळी निक्कीने पलटी मारली.

हेही वाचा : Bigg Boss Marathi “Wildcard नाही ‘चाइल्ड’ कार्ड आहे”, संग्रामची अरबाजशी हातमिळवणी; खेळ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “दुसरा वैभव…”

Bigg Boss Marathi – निक्कीने अरबाजला दिला धोका

अरबाजने निक्कीला “जान्हवीला बाद करू नकोस…माझी तिच्याशी डील झाली” आहे असं सांगितलं. पण, निक्की जान्हवीला बाद करण्यावर ठाम होती. शेवटी ‘ए टीम’ने बहुमताने अंकिता-अभिजीतला बाद करायचं ठरवलं. पण, प्रत्यक्ष टास्कमध्ये घडलं काहीतरी वेगळंच… निक्कीने अंकिताला ठरल्याप्रमाणे बाद केलं पण, अभिजीतचं नाव घेण्याची वेळ आल्यावर तिने वेळेवर पलटी मारून पॅडीच्या घरट्यात अंड ठेवलं. यामुळे अरबाज प्रचंड संतापला होता. यावरून त्याने निक्कीला जाब देखील विचारला पण, निक्कीने चुकून घडल्याचं कारण देत यावर जास्त बोलणं टाळलं.

निक्कीने अभिजीतला बाद न केल्यामुळे अरबाज प्रचंड संतापल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे अरबाजने सोफ्याला लाथ मारून त्यानंतर बेडवर हात मारून सर्व राग काढण्याचा प्रयत्न केल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं. धनंजय देखील ऐनवेळी निक्कीने निर्णय बदलल्यामुळे अरबाजसमोर नाराजी व्यक्त करतो. आता यावरून अरबाज-निक्की एकमेकांना पुन्हा एकदा भिडणार आहेत. नेटकऱ्यांनी देखील कमेंट्समध्ये निक्कीने फारच हुशारीने खेळल्याचं मान्य केलं आहे.

हेही वाचा : Video : “हिशोब सांगते ऐका…”, ५९ वर्षांपूर्वीच्या मराठी गीतावर नारकर जोडप्याने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, “ढोलकीचा ताल…”

दरम्यान, आता कॅप्टन्सी कार्याचा उर्वरित टास्क आजच्या भागात ( Bigg Boss Marathi ) पाहायला मिळेलं. आता दोन्ही टीमपैकी कोणती टीम कॅप्टन्सी उमेदवारीसाठी पात्र ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.